Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी बार्टी (BARTI) कडून एकरकमी 10 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ऑनलाइन अर्ज 10 सप्टेंबरपर्यंत आणि ऑफलाइन प्रत 11 सप्टेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 04, 2026 | 09:45 PM
MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत

MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत

Follow Us
Follow Us:
  • MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 उत्तीर्ण SC उमेदवारांना 10 हजारांची मदत
  • ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत 10 सप्टेंबर 2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत
  • ऑनलाइनसोबत ऑफलाइन अर्जाची स्व-साक्षांकित प्रत पाठवणेही अनिवार्य
 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये यश मिळवलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी (BARTI) कडून अशा पात्र उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र उमेदवाराला एकरकमी 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

अर्जासाठी दोन्ही पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करावी लागणार

मुलाखतीची तयारी करताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने ही मदत देण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज 10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावा लागणार आहे. त्यानंतर अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह बार्टीच्या पुणे कार्यालयात पोस्ट किंवा कुरियरने पाठवावी लागेल. ही प्रत 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयाकडे पोहोचणे आवश्यक आहे.

NEET PG 2026 च्या गोपनीयतेचा भंग केल्यास कडक कारवाई; परीक्षेच्या ‘या’ नियमांचे पालन करावे लागणार?

कोणाला मिळणार योजनेचा लाभ?

या आर्थिक सहाय्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच, 25 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर झालेल्या MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय कमाल 35 वर्षे असावे.

अर्जासोबत जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, MPSC मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि स्वतःच्या नावावरील राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची प्रत जोडावी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे केवळ ऑनलाइन किंवा केवळ ऑफलाइन अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. दोन्ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.

अर्जाची प्रत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), 28/28, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे – 411001 या पत्त्यावर पाठवावी. अधिक माहितीसाठी 020-26333330 किंवा 020-26333339 या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.

NEET PG 2026 Supreme Court: नीट री एग्झामची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली अन् याचिकाकर्त्यावरचं ठोठावला २५ हजारांचा दंड

Web Title: Barti financial assistance sc candidates mpsc state service interview 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • MPSC Exam

संबंधित बातम्या

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार
1

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
2

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
3

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा

युवा पर्यटन धोरणातून तरुणांना पर्यटन क्षेत्रात संधी; शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘युवा पर्यटन मंडळां’चा विस्तार
4

युवा पर्यटन धोरणातून तरुणांना पर्यटन क्षेत्रात संधी; शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘युवा पर्यटन मंडळां’चा विस्तार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.