Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे सुशोभीकरण करा; महाबळेश्वर शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सध्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या वर्षाचे औचित्य साधून या स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेणे गरजेचे आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2026 | 01:28 PM
बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे सुशोभीकरण करा; महाबळेश्वर शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे सुशोभीकरण करा; महाबळेश्वर शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Follow Us
Follow Us:

महाबळेश्वर : शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकातील स्मारकाचे प्रलंबित असलेले सुशोभीकरण आणि दुरुस्तीचे काम तातडीने मार्गी लावावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेला देण्यात आला आहे. यासंदर्भात नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील शिंदे उपनगराध्यक्ष नासिरभाई मुलाणी आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. बाळासाहेब ठाकरे चौकातील स्मारकाच्या सुशोभीकरणाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी ५ नोव्हेंबर २०१९, ११ नोव्हेंबर २०१९, ११ जानेवारी २०२० आणि १६ फेब्रुवारी २०२१ अशा विविध तारखांना वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

सध्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या वर्षाचे औचित्य साधून या स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेणे गरजेचे आहे. मात्र, वारंवार मागणी करून सुद्धा पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर शहरातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

“प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे. जर याकडे दुर्लक्ष झाले, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा या निवेदनातून देण्यात आला. यावेळी नगरसेवक अफजल सुतार, शरद बावळेकर, आर. डी. मोरे हे देखील उपस्थित होते. या निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख महेश (राजा) वसंत गुजर, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, विभाग प्रमुख शंकर ढेबे, शाखा प्रमुख शहानवाज खारकडे, तेजस बोधले बाळासाहेब ढेबे यांच्या सह्या असून यावेळी ते देखील उपस्थित होते.

Web Title: Beautify the balasaheb thackeray memorial mahabaleshwar shiv sena submits memorandum to chief officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Satara News
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
1

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
2

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
3

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
4

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.