Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीडकरांचं पुणे रेल्वे कनेक्शन अखेर सुरू झालं. सुनेत्रा पवारांच्या हस्ते बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या प्रयत्नांचा उल्लेख करत बीडच्या विकासासाठी पुढेही काम करण्याचं आश्वासन दिलं.

  • By विवेक
Updated On: Sep 17, 2026 | 03:08 PM
बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा

Follow Us
Follow Us:
  • बीड-पुणे रेल्वेला सुनेत्रा पवारांच्या हस्ते हिरवा झेंडा
  • अजित पवारांनी दिलेला शब्द पूर्ण झाल्याचं सुनेत्रा पवारांचं वक्तव्य
  • बीड-पनवेल थेट रेल्वे प्रवासासाठीही प्रयत्न करण्याचं आश्वासन
 

मराठवाड्यातील बीडकरांसाठी आजचा दिवस खास ठरला आहे. बीड-पुणे रेल्वेचा आज शुभारंभ करण्यात आला. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर बीडहून ही रेल्वे पुण्याच्या दिशेने रवाना झाली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीडमधून पहिल्यांदाच पुण्यासाठी रेल्वे धावली, त्यामुळे बीडकरांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. याआधी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाल्याने जिल्ह्याचं रेल्वे कनेक्शन प्रत्यक्षात आलं होतं. आता पुण्याशी थेट रेल्वे जोडणी झाल्याने प्रवासाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

‘अजितदादांनी शब्द दिला होता, तो पाळला’

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी बीडच्या रेल्वे प्रवासाच्या आठवणी सांगितल्या. गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाली होती. त्यावेळी अजित पवारांनी पुढच्या वर्षी बीडहून थेट पुण्याला जाता येईल, असा शब्द दिल्याचा उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला.

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

अजित पवारांच्या दूरदृष्टीमुळे आणि सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे हा टप्पा गाठता आला, असं त्यांनी सांगितलं. “अजितदादांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळण्याचं भाग्य मला मिळालं,” असं म्हणत त्यांनी या प्रकल्पातील अजित पवारांच्या योगदानाचा उल्लेख केला.

बीडच्या व्यापाऱ्यांनाही फायदा होणार

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढल्याने बीडच्या व्यापारी वर्गाला फायदा होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांसोबतच व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांसाठीही ही रेल्वे महत्त्वाची ठरणार आहे.

बीडचा विकास आणि कनेक्टिव्हिटी हा आपला ध्यास असल्याचं सांगत सुनेत्रा पवार यांनी पुढील काळातही रेल्वे सुविधांसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.

साखर कारखान्याला मिळणार आता सॉफ्ट लोन; पोफाळीच्या वसंत साखर कारखान्यालाही अनुदान

बीड-पनवेल थेट रेल्वेसाठीही प्रयत्न

खासदार बजरंग सोनवणे यांनी मांडलेल्या मागण्यांचा उल्लेख करत बीड ते पनवेल थेट रेल्वे प्रवासासाठीही प्रयत्न करणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याचं आश्वासन देत त्यांनी बीड आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.

त्यामुळे बीड-पुणे रेल्वेनंतर आता बीड-पनवेल कनेक्टिव्हिटीच्या मागणीकडे बीडकरांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Beed pune railway express inauguration sunetra pawar ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Beed News
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
1

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
2

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
3

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा
4

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.