Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil News: त्या दिवशी जिल्ह्यात एक चाकही फिरू देणार नाही….; जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून सरकारला इशारा

“परळीतील एकजण सरकारला अडचणीत आणणारी विधानं का करतो, हे सरकारने शोधले पाहिजे.” असे म्हणत जरांगे यांनी संतोष देशमुख प्रकरणात कठोर कारवाईची मागणी पुन्हा अधोरेखित केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 09, 2025 | 03:52 PM
Beed Murder Case, Santosh Deshmukh,

Beed Murder Case, Santosh Deshmukh,

Follow Us
Close
Follow Us:
  • संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण
  • आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही
  • संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास मंदावला
Manoj Jarange Patil News: बीडमधील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत असताना मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळीदेखील जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल एका वर्षात लागेल असे मुख्यमंत्री स्वतः म्हणाले होते. आरोपींना फाशीची हमीदेखील दिली होती, मात्र त्यांच्या हत्येला एक वर्ष उलटून गेलं असतानाही आजही दिरंगाई सुरू आहे,” असे जरांगे म्हणाले.

राज्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या यंत्रणेमुळे या कामात अडथळे आणले जात आहेत., अशी अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. ह प्रकरणांच भिजत घोंगड ठेवायच आहे. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Winter Session 2025 : नाहीतर घरी बसावं लागेल..! CM फडणवीसांचा भरसभागृहातून स्वपक्षातील आमदाराला इशारा

मनोज जरांगे म्हणाले, संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आम्ही एक आहोत. एका लेकीला आणि लेकाला त्यांचा बाप दिसत नाही. पण आता आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही. परळीवाल्यांनी काही माणसं कामाला लावलू आहेत. परळीतील काही लोकांनी जाणूनबुजून आरोपी सुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या आहेत. पण ज्या दिवशी आरोपी सुटेल, त्या दिवशी संपूर्ण जिल्हा बंद ठेवू, त्यानंतर राज्य बंद करू,” असा इशारा देखील त्यांनी दिला.

“परळीतील एकजण सरकारला अडचणीत आणणारी विधानं का करतो, हे सरकारने शोधले पाहिजे.” असे म्हणत जरांगे यांनी संतोष देशमुख प्रकरणात कठोर कारवाईची मागणी पुन्हा अधोरेखित केली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास मंदावल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर तीव्र टीका केली. “धन्यानीच हा संपूर्ण प्रकार घडवून आणला आहे. आरोपींना फाशी होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. पण ज्या दिवशी आरोपी सुटला, त्या दिवशी राज्यात चाकही फिरणार नाही.” सुरुवातीला या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू होता. कारण देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता, पण आता दिरंगाई जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.

सिल्लोडच्या ९२ हजार डिजिटल सातबारांना पूर्ण कायदेशीर मान्यता; शेतकऱ्यांचा तलाठी कार्यालयातील हेलपाटा थांबणार

“क्रूर हत्येतील आरोपी बाहेर कसे फिरतात? कृष्णा आंधळे कुठे आहे आणि तो सापडत का नाही?” सरकार या प्रकरणात कोणता दबाव आणत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संतोष देशमुखांची हत्या करणारे हत्या करणारे सापडत नाहीत, मग पोलीस महासंचालकांसोबत कोणत्या विषयाची बैठक होते? परळीतील व्यक्ती तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा आहे का?” असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.

जरांगे म्हणाले की, “कृष्णा आंधळेने हत्या करतानाचे व्हिडिओ कॉल केले आहेत. तो पकडला की प्रकरणाचा मोठा उलगडा होईल.” त्यांनी सांगितले की, हा मुद्दा आज अधिवेशनातही उपस्थित झाला असून सरकारने चार ते पाच महिन्यांत हा विषय निकाली काढावा.

जगातील सर्वात लांबसडक कार, 100 फूट लांबी 75 लोकांची जागा; स्विमिंग पूल ते हॅलिपॅड सगळीच सोय

सरकारवर दबाव असल्याची शक्यता व्यक्त करत ते म्हणाले, “काल अजित पवारांसोबत त्या व्यक्तीची बैठक झाली. पोलीस महासंचालकांनाही यात सामील केलं जातंय. विकासाच्या कामात डीजीपीचे काय काम? काहीतरी शिजत आहे.”

फडणवीसांना थेट इशारा देत जरांगे म्हणाले, “फडणवीस साहेब, तुम्ही या खेळात सहभागी होऊ नका. चुकीच्या माणसाला जवळ ठेवल्यास आम्हाला अजितदादांचा राग येणार. तसेच, पीडित कुटुंबाने पुन्हा हाक दिल्यास “आम्ही कोणताही विचार न करता उभे राहू,” असा इशारा देत त्यांनी सरकारला कठोर निर्णयाची मागणी केली.

 

 

Web Title: Manoj jarange intensifies demand for justice in santosh deshmukh murder case warns of district shutdown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Beed Murder Case
  • Manoj Jarange Patil
  • Santosh Deshmukh

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil : सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा…; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
1

Manoj Jarange Patil : सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा…; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.