Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा प्रश्न ऐरणीवर! ‘परिपत्रकांचा अर्थ समजत नसेल तर पगार कशाचा घेता?’ श्रीरंग बरगेंचा संतप्त सवाल

MSRTC Beed News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बीड विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता यादीत घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून श्रीरंग बरगे यांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'परिपत्रकांचा अर्थ समजत नसेल तर पगार कशाचा घेता?'

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 13, 2026 | 03:51 PM
एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा प्रश्न ऐरणीवर! 'परिपत्रकांचा अर्थ समजत नसेल तर पगार कशाचा घेता?' श्रीरंग बरगेंचा संतप्त सवाल

एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा प्रश्न ऐरणीवर! 'परिपत्रकांचा अर्थ समजत नसेल तर पगार कशाचा घेता?' श्रीरंग बरगेंचा संतप्त सवाल

Follow Us
Follow Us:
  • एसटीच्या बीड विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता यादीत घोळ
  • परिपत्रकांचा अर्थ समजत नसेल तर पगार कशाचा घेता?
  • श्रीरंग बरगे यांचा स्थानिक अधिकाऱ्यांना सवाल!
बीड : एसटी महामंडळाच्या बीड विभागात कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता सूचित महामंडळाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकांचा चुकीचा अर्थ लाऊन ज्येष्ठतायादी तयार केली आली असून परिपत्रकांचा नीट अर्थ समजत नसेल तर प्रशासनातील स्थानिक अधिकारी पगार कशाचा घेत आहेत? असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी स्थानिक पातळीवरील प्रशासनाला केला आहे. (MSRTC Beed News)

बरगे हे आज बीड जिल्ह्यात श्रीरंग बरगे यांनी भेट दिली असून आले असून त्यांनी आज एसटीच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. व कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष वसंत बोराडे, प्रादेशिक सचिव बालाजी ढेपे, बीड विभागाचे विभागीय अध्यक्ष अशोक महानोर, कार्याध्यक्ष शेशेराव नागरगोजे, विभागीय सचिव ईश्वर माळवाले, कोषाध्यक्ष भगवान गर्जे, श्रीकृष्ण येवले, राजकुमार आंधळे, बालकृष्ण पेंटुळे, उल्हास भड, संभाजी घाडगे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MSRTC Land Development: एसटी महामंडळाला मिळणार उत्पन्नाचा नवा स्रोत; पीपीपी तत्त्वावर जमिनींचा विकास करण्याचा निर्णय

एसटीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेसंदर्भात महामंडळाने आतापर्यंत तीन वेगवेगळी परिपत्रके काढली असून त्यात स्पष्ट सूचना प्रसारित करण्यात आल्या असताना, सुद्धा या परिपत्रकांचा गैर अर्थ लाऊन राज्यभरातील काही विभागात अंमलबजावणी केली जात आहे. बीड विभागाने सुद्धा तोच कित्ता गिरवला असून सेवा ज्येष्ठता यादीत घोळ झाला असून परिपत्रकाची नीट अंमलबजावणी करण्यात न आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.

परिपत्रकात स्पष्ट सूचना असून देखील बीड विभागातील प्रशासन या संदर्भात मुंबईतील एसटीच्या मुख्य कार्यालयाकडून वारंवार मार्गदर्शन मागवित असून अधिकाऱ्यांनी अडाणीपणाना कळस गाठला आहे.हे दुर्दैवी असून परिपत्रकांचा अर्थ समजत नसेल तर स्थानिक प्रशासनाने अपयश आहे.अशीच स्थिती एसटीच्या राज्यभरातील अजून काही विभागात असल्याने कर्मचाऱ्यांनी सेवाज्येष्ठता सूचिबद्दल न्यायालयात धाव घेतली असून सर्वांना सारखा न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा स्पष्ट सूचना देण्यात याव्यात यासाठी एक सविस्तर निवेदन राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्याकडे गेल्याच आठवड्यात संघटनेमार्फत प्रत्यक्ष भेटून देण्यात आले असून त्यांनीही सेवाज्येष्ठता परिपत्रकाच्या नीट अंमलबजावणी बद्दल सूचना दिल्या आहेत.

एसटी महामंडळाचे राज्यात एकूण ३१ विभाग आहेत. या सर्व विभागांमध्ये सेवाज्येष्ठता निश्चित करण्यासाठी एकसमान पद्धत आहे. मात्र, मध्यवर्ती कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकाचा बीड विभागांकडून चुकीच्या पद्धतीने अर्थ लावण्यात आल्यामुळे सेवाज्येष्ठता याद्यांमध्ये विसंगती निर्माण झाली असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.

येत्या गुरुवारच्या अगोदर बीड विभागात सेवा ज्येष्ठतासूची संदर्भातील परिपत्रकांची नीट अंमलबजावणी करण्यात आली नाहीतर इथले स्थानिक अन्यायग्रस्त कर्मचारी १५ ऑक्टोबर पासून एसटीच्या बीड विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करतील व त्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील असा इशाराही बरगे यांनी दिला आहे.

ST Bus Service: मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू

Web Title: Msrtc beed division employee seniority list irregularities shrirang barge questions officials sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • msrtc
  • Shrirang Barge
  • ST Employees

संबंधित बातम्या

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप
1

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप

MSRTC Land Development: एसटी महामंडळाला मिळणार उत्पन्नाचा नवा स्रोत; पीपीपी तत्त्वावर जमिनींचा विकास करण्याचा निर्णय
2

MSRTC Land Development: एसटी महामंडळाला मिळणार उत्पन्नाचा नवा स्रोत; पीपीपी तत्त्वावर जमिनींचा विकास करण्याचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.