
तस्करीसाठी मालवाहू वाहनाचा वापर : या कारवाईत गुलाम वाजिद गुलाम वजीर, रा. महाकालीनगर, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर आणि वाहनचालक शेख शहाबाज शेख सरवर, रा. कपिलनगर, नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तस्करीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पालांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध कलम ८ (क), २० (ब) (२) (क) आणि २९, एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपास एएनटीएफ नागपूरकडून करण्यात येत आहे.
एएनटीएफची तस्करीविरोधी मोहीम कायम
ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक तथा एएनटीएफ महाराष्ट्र ज्योतीप्रिया सिंह, पोलिस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एएनटीएफ नागपूरचे पोलिस अधीक्षक अजित टिके यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. पोलिस निरीक्षक नंदकुमार केंजळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कोळेकर, पोलिस उपनिरीक्षक टिपुर्णे, महिला पोलिस उपनिरीक्षक कडू तसेच एएनटीएफ नागपूरच्या पथकाने केली.