कौटुंबिक जबाबदारीमुळे ही मुले शिक्षणापासून दुरावल्याचे दिसून येते. सध्या रस्ता बांधकामावर स्थलांतरित मजूर आहेत. या बालकांचा शोध घेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या मोहिमेद्वारे होत आहे.
बेटाळा रेती घाट डेपोच्या नावाने अधिकृत असला तरी प्रत्यक्षात येथे महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात अवैध रेती चोरी सुरू आहे. रविवारी सकाळी नदी पात्रातून अवैध रेती उपसा सुरू होता.
एका व्यक्तीला एसटीला सुमारे 50 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी साध्या गाडीने 92 रुपये, शिवशाही 133 रूपये, तर शिवाईला 125 रूपये आणि 145 रुपये मोजावे लागत आहेत. तर दुचाकीने एवढ्याच अंतरासाठी 105 रुपयांत दोघांना प्रवास होत आहे
भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटाचा आवाज 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पोहोचला, ज्यामुळे परिसरात मोठी घबराट पसरली. स्फोटानंतर भीषण आग लागली आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते.
ग्रामसेवक संजय गहाने यांच्या फिर्यादीवरून लोकेश एकनाथ भेंडारकर (रा.विरली-बूज) याच्याविरोधात लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामसेवक संवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उमेश दुचाकीने लाखनीकडून भंडाऱ्याकडे जात होता. दरम्यान, त्याची दुचाकी एका स्कूटीला मागून धडकली. दुचाकीसह रस्त्यावर पडून उमेश यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
भंडारा जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समितीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ही मुदत संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी सभापती व उपसभापती निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
गेल्या फेब्रुवारी 2023 ते जून 2024 या कालावधीत दरमहा मिळणारी रक्कम थांबली. त्यांनी आरोपींना घटनेत गुंतवलेली रक्कम देण्याची मागणी केली. मात्र, गेल्या एक वर्षापासून गुंतवणुकीची रक्कम देण्यात येत नव्हती.
साकोली येथील नागरिक माकडांच्या उपद्रवाने त्रस्त झाले आहे. माकडांची टोली परसबागेतील झाड, छतावरील पाण्याच्या टाक्या यावर उच्छाद मांडला आहे. माकडांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
भंडाऱ्यातील तरूणांनी, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्या, अन्यथा लग्नासाठी तुम्हीचं मुली शोधून द्या, असे मजकूर असलेले बॅनर्स हातात आशयाचे बॅनर हातात घेऊन आंदोलन केले आहे.
प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्याच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयामार्फत अधिकृत ट्विटर हॅंडलवर पोस्ट करून पोस्ट कऱण्यात आली आहे
राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे, वडगाव मावळमध्ये भावांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वडगावमावळमध्ये सख्खा भाऊच पक्का वैरी ठरला आहे.