संग्रहित फोटो
साकोली : माकडाला हाकलण्यासाठी छतावर चढलेल्या तरुणीचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना 29 डिसेंबरला शिवाजी वॉर्ड साकोली येथे घडली. भाग्यश्री अरूण गजापुरे (27, रा. शिवाजी वॉर्ड, साकोली) असे मृत तरुणीचे नाव आहे. स्लॅबच्या छतावर माकडांचा उच्छाद सुरू असलेल्या भाग्यश्री ही काठी घेऊन हाकलण्यासाठी चढली. मात्र, तोल गेल्याने ती खाली जमिनीवर पडली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. नंतर तिचा मृत्यू झाला.
भाग्यश्री गजापुरे या तरूणीला साकोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्याने भाग्यश्रीला घरी आणण्यात आले. मात्र, रात्री उशिरा तिची प्रकृती अचानक बिघडल्याने उपजिल्हा रूग्णालय साकोली येथे दाखल करण्यात आले. एक दिवसाच्या उपचारानंतर अखेर शुक्रवारी (दि. 3) भाग्यश्रीचा मृत्यू झाला.
माकडांच्या उपद्रवाने लोक त्रस्त
साकोली येथील नागरिक माकडांच्या उपद्रवाने त्रस्त झाले आहे. माकडांची टोली परसबागेतील झाड, छतावरील पाण्याच्या टाक्या यावर उच्छाद मांडला आहे. माकडांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. माकडांचा उपद्रव आटोक्यात आणण्यासाठी वन विभाग किंवा नगर परिषदेकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत.
रुग्णालयात पुरेशी आरोग्य सेवा नाही
साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक किंवा आपत्कालीन सेवा सुविधा पुरविल्या जात नाहीत. आधुनिक साधनांचा पुरवठा किंवा पुरेसा कर्मचारी वर्गही पुरविण्यात आलेला नाही. सक्षम डॉक्टरही उपस्थित नसल्यामुळे रुग्णांना भंडारा येथील रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.
छत्तीसगडमध्ये तरूण पत्रकाराचा हत्या
छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सेप्टिक टँकमध्ये तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह आढळला. पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. मुकेश चंद्राकर यांच्या डोक्यावर 15 जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. याशिवाय यकृताचे चार तुकडे आणि पाच बरगड्या तुटल्या. एवढेच नाही तर त्याची मान तुटलेली आणि हृदय फाटलेल्या अवस्थेत सापडले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पत्रकर मुकेश चंद्राकर यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.
सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून खून
तर दुसरीकडे, दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. योगेश लक्ष्मण काळभोर (वय ४५, रा. लाेणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नंदू उर्फ पोपट लक्ष्मण म्हात्रे (वय ३९, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) याला अटक करण्यात आली.