Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भंडार्ली डम्पिंग आजपासून बंद, ग्रामस्थांनी घेतला प्रत्यक्ष स्थळी जाऊन निर्णय; डम्पिंगमुळे परिसरावर दुर्गंधीची चादर

१४ गावांमधील भंडार्ली गावच्या डोंगरावर ठाणे महापालिकेचा सुरू असलेला डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 15, 2023 | 06:12 AM
भंडार्ली डम्पिंग आजपासून बंद, ग्रामस्थांनी घेतला प्रत्यक्ष स्थळी जाऊन निर्णय; डम्पिंगमुळे परिसरावर दुर्गंधीची चादर
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण ग्रामीण : १४ गावांमधील भंडार्ली गावच्या डोंगरावर ठाणे महापालिकेचा सुरू असलेला डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. शुक्रवारी स्थानिक आमदार राजू पाटील यांच्यासह १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी संयुक्त पाहणी करत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण ग्रामीण भागातील भंडारली गावच्या डोंगरावर ठाणे महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड सुरू करण्यात आले होते. एका वर्षासाठी सुरू करण्यात आलेले हे डम्पिंग राहून एक वर्ष उलटला तरी सुरूच आहे. या डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरात दुर्गंधीच साम्राज्य,भात शेतीला प्रदूषित पाण्याचा धोका तसेच गावात प्रचंड माशांचे थवे दाखल झाले आहेत. वारंवार महापालिकेच्या निदर्शनास हि बाब आणून देखील महानगरपालिका लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असल्याने हे डम्पिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवारपासून ग्रामस्थ स्वतः रस्त्यावर थांबून एकही कचऱ्याची गाडी डोंगरावर जाऊ देणार नाहीत अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. सध्या या डम्पिंग वरील पाण्याचे प्रवाह भंडार्ली गावामधून वाहत असल्याने शेती आणि नद्या, नाले देखील प्रदूषणाच्या विळखात सापडले आहेत. त्यामुळे आता १४ गावातील जनतेचा रोष हा ठाणे मनपाला सहन करावा लागणार आहे.

यावेळी आमदार राजू पाटील म्हणाले की, तत्कालीन नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली ग्रामस्थांना बैठकीतील आश्वासन पाळली नाहीत. तर वेळेत डम्पिंग बंद करणार असल्याचे देखील सांगितले होते. १४ गावांमध्ये सुखसोयी देणार असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची आश्वासन पाळली गेली नसल्याने आज सर्व पक्षीय विकास समिती आणि ग्रामस्थांनी हे डम्पिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिसरात कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील अस देखील आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील, सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, गुरुनाथ पाटील,विजय पाटील यांसह ग्रामस्थ आणि संबंधित डम्पिंग ग्राउंडचे ठेकेदार देखील उपस्थित होते.

सर्व पक्षीय विकास समिती आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती तातडीने स्थानिक पोलिसांना कळवण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांची भेट घेत डम्पिंग आम्ही बंद करत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.त्यामुळे वेळेत बंद न झालेले डम्पिंग बंद न झाल्यास भंडार्ली डम्पिंग प्रश्न पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नुकसान ग्रस्तांचे तातडीने पंचनामे होणार !

भंडार्ली येथील डम्पिंगमुळे परिसरातील बागायतदार, भात शेती करणारे शेतकरी, तबेला मालक तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या संदर्भात तातडीने पंचनामे करून नागरिकांना योग्य ती मदत शासनाद्वारे करण्याचे आश्वासन मनसे आमदार राजू पाटील यांनी दिले आहे. या संदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार राजू पाटील यांनी स्थानिकांना दिले आहे.

Web Title: Bhandarli dumping closed from today villagers took the decision by going to the actual spot due to dumping stench blankets the area nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2023 | 06:12 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • kalyan
  • kokan
  • maharashtra
  • thane

संबंधित बातम्या

शाळकरी चिमुकल्याने बनवला महाराष्ट्रातील जागतिक वारसा किल्ल्यांचा देखावा, ठाण्यात कौतुकाची लाट
1

शाळकरी चिमुकल्याने बनवला महाराष्ट्रातील जागतिक वारसा किल्ल्यांचा देखावा, ठाण्यात कौतुकाची लाट

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार
2

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
3

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

Kalyan Police : कल्याण पोलिसांचा फिल्मी स्टाईल सर्च ऑपेरेशन, विशाखापट्टनमच्या जंगलातून आंतरराज्य गांजा तस्करांचा पर्दाफाश
4

Kalyan Police : कल्याण पोलिसांचा फिल्मी स्टाईल सर्च ऑपेरेशन, विशाखापट्टनमच्या जंगलातून आंतरराज्य गांजा तस्करांचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.