सौदी अरेबियामध्ये भीषण रस्ता अपघात: उमराहवरून परतताना केरळमधील एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Saudi Arabia road accident Kerala family 2026 : पवित्र उमराह यात्रा पूर्ण करून मोठ्या आनंदाने परतणाऱ्या एका भारतीय कुटुंबावर सौदी अरेबियात (Saudi Arabia) काळाने भीषण झडप घातली आहे. मदिना प्रांतातील महामार्गावर झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे केरळसह आखाती देशांतील भारतीय समुदायावर शोककळा पसरली आहे. ज्या घरातून तीर्थयात्रेसाठी आनंदाने निरोप दिला होता, तिथे आता केवळ आक्रोश उरला आहे.
केरळमधील मंजेरी येथील रहिवासी अब्दुल जलील हे गेल्या अनेक वर्षांपासून सौदीतील जेद्दाहमध्ये नोकरी करत होते. आपल्या कुटुंबाला पवित्र स्थळांचे दर्शन घडवण्यासाठी त्यांनी आपल्या आईला, पत्नीला आणि मुलांना पर्यटक व्हिसावर सौदीला बोलावून घेतले होते. संपूर्ण कुटुंबाने मोठ्या श्रद्धेने उमराह पूर्ण केला. मात्र, मक्का आणि मदिना येथील तीर्थयात्रा आटोपून जेद्दाहला परतत असताना, मदिना महामार्गावर त्यांच्या कारला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटली! ‘हा आमचा शेवटचा श्वास नाही’; अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर व्हेनेझुएलाची आर्त हाक
या अपघातात अब्दुल जलील (वय ४५), त्यांची वृद्ध आई मैमुनाथ, पत्नी थसना आणि त्यांचा १४ वर्षांचा मुलगा आदिल यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या मुलाच्या भविष्याची स्वप्ने जलील पाहत होते, तो आदिलही या अपघातात देवाघरी गेला. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या कुटुंबाला पाहून मदतीसाठी धावलेल्या लोकांच्याही डोळ्यांत पाणी आले.
Four members of #Kerala family killed in accident in Saudi Arabia after returning from #Umrah https://t.co/kZqtxCpfly — TheNewsMinute (@thenewsminute) January 4, 2026
credit : social media and Twitter
या भीषण दुर्घटनेत एक चमत्कारही घडला. जलील यांच्या तीन लहान मुली आयेशा, हादिया आणि नूरा या अपघातातून वाचल्या आहेत. मात्र, त्यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तातडीने मदिना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चिमुरड्यांना अजून हेही माहीत नाही की त्यांच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र कायमचे हरवले आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असून संपूर्ण केरळ समाज त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप
या घटनेची माहिती मिळताच सौदीतील भारतीय दूतावास आणि केरळमधील स्थानिक संघटना मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. मृतदेह मायदेशी पाठवण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली जात आहे. जेद्दाह आणि मदिना येथील भारतीय समुदाय जखमी मुलींच्या देखभालीसाठी रुग्णालयात उपस्थित आहे. मलप्पुरममधील त्यांच्या वडिलोपार्जित गावी या घटनेची वार्ता पोहोचताच संपूर्ण गाव सुन्न झाले असून नातेवाईकांचा रडण्याचा आवाज कोणाचेही हृदय पिळवटून टाकणारा आहे.
Ans: हा भीषण अपघात सौदी अरेबियातील मदिना जवळील महामार्गावर ट्रक आणि कारच्या धडकेमुळे झाला.
Ans: मृत पावलेले सर्वजण भारतातील केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी येथील रहिवासी होते.
Ans: या अपघातातून अब्दुल जलील यांच्या तीन लहान मुली (आयेशा, हादिया आणि नूरा) वाचल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






