Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या बड्या नेत्यांनी केली शरद पवारांवर टीका, शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात…

आगामी लोकसभा निवडणुकीचा धुराळा देशभरात सगळीकडे उडणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्ष नेत्यांवर अनेक टीका आणि आरोप प्रत्यारोप केले जात आहे. सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 25, 2024 | 01:10 PM
भाजपच्या बड्या नेत्यांनी केली शरद पवारांवर टीका, शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात…
Follow Us
Close
Follow Us:

आगामी लोकसभा निवडणुकीचा धुराळा देशभरात सगळीकडे उडणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्ष नेत्यांवर अनेक टीका आणि आरोप प्रत्यारोप केले जात आहे. सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. तसेच शरद पवार यांनी पक्षाचा शपथनाम मांडला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या दहा वर्षात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. अमित शहांनी आधी हे सांगावं की गेल्या दहा वर्षांत त्यांनी आत्महत्या थांबवण्यासाठी काय काम केलं? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. अशातच महायुतीच्या एका बड्या नेत्याने शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटने सगळीकडे खळबळ माजली आहे. त्यांनी शरद पवार गटावर जहरी टीका केली आहे. शरद पवारांचा शपथनामा म्हणजे जगातील सगळ्यात मोठी फसवणूक आहे. शरद पवारांनी धोका दिल्याच्या घटनेचा दाखल दिला आहे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. २६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती… — Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 25, 2024

 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे,

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे.

खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?

महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे.

२६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली.

आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात?
शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे !!

१९७७ मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले.

१९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले.

१९८० मध्ये ४० आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

१९८८ मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले.

१९९९ मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली.

२०१९ मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला!

२०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली.

खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?, असे लिहीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

Web Title: Big bjp leaders criticized sharad pawar sharad pawars political life bjp loksabha election sharad pawar nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2024 | 01:07 PM

Topics:  

  • BJP
  • election 2024
  • maharashtra
  • narendra modi

संबंधित बातम्या

मुंबई मनपातील शिक्षकांचे PF सह अन्य प्रश्न सुटल्यात जमा, प्रशासकीय मंजुरी मिळाली
1

मुंबई मनपातील शिक्षकांचे PF सह अन्य प्रश्न सुटल्यात जमा, प्रशासकीय मंजुरी मिळाली

MHADA lottery : घराचे स्वप्न साकार होणार! म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार लॉटरी
2

MHADA lottery : घराचे स्वप्न साकार होणार! म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार लॉटरी

Bihar Election 2025: ‘एनडीए’चा अंतर्गत वाद मिटला? बिहार विधानसभेसाठी ‘या’ दिवशी पहिली यादी येणार? वाचाच…
3

Bihar Election 2025: ‘एनडीए’चा अंतर्गत वाद मिटला? बिहार विधानसभेसाठी ‘या’ दिवशी पहिली यादी येणार? वाचाच…

महाभोंडला अन् भव्य लकी ड्रॅा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; साळेगावकरांच्या वतीने हजारो महिलांना बक्षिसांचे वाटप
4

महाभोंडला अन् भव्य लकी ड्रॅा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; साळेगावकरांच्या वतीने हजारो महिलांना बक्षिसांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.