Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरूच; ‘या’ बड्या नेत्यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि जितेंद्र ननावरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 10, 2025 | 03:36 PM
राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरूच; 'या' बड्या नेत्यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरूच; 'या' बड्या नेत्यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:
  • आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी
  • राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा जोरात
  • बड्या नेत्यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

पिंपरी : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी वेगाने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा धक्का देत दोन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि जितेंद्र ननावरे यांनी पक्ष प्रवेश केला आहे.

या प्रवेश सोहळ्यात शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, माजी नगरसेवक नाना काटे आणि अजित गव्हाणे उपस्थित होते. चिंचवडमधील अनंत कोऱ्हाळे यांनी पूर्वी चिंचवड विधानसभा प्रमुख म्हणून काम पाहिले असून, तेथील राजकारणात त्यांचा चांगला प्रभाव आहे. तर पिंपरीतील जितेंद्र ननावरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्द घडविली असून, त्यांच्या प्रभागात त्यांचे मजबूत जनसंपर्काचे जाळे आहे. त्यामुळे या दोघांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीसाठी निवडणुकीपूर्वीचा बळकट टप्पा मानला जात आहे.

राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा जोरात

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पडझडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा संघटित होत असून, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि वरिष्ठ नेते नाना काटे यांच्या समन्वयातून कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळत आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार उभे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘‘स्वबळावर निवडणूक लढवायची’’ असा अजित पवारांचा आदेश लक्षात घेऊन स्थानिक पदाधिकारी पूर्ण जोमाने कामाला लागले आहेत. या नव्या प्रवेशांमुळे आणि सक्रिय हालचालींमुळे राष्ट्रवादीत पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नवा रंग भरला आहे.

Web Title: Big leaders from pimpri have joined the ncp in the presence of ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • ajit pawar
  • NCP Politics
  • Pimpri News

संबंधित बातम्या

NCP Politics: अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे पाटलांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी
1

NCP Politics: अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे पाटलांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी

Parth Pawar Controversy: अजित पवारांना झटका काँग्रेस म्हणतेय षडयंत्र, शरद पवारांवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरे करणार काय?
2

Parth Pawar Controversy: अजित पवारांना झटका काँग्रेस म्हणतेय षडयंत्र, शरद पवारांवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरे करणार काय?

पिंपरी-निगडी मेट्रो मार्गाचे 35 टक्के काम पूर्ण; डिसेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण होणार?
3

पिंपरी-निगडी मेट्रो मार्गाचे 35 टक्के काम पूर्ण; डिसेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण होणार?

Pune Land Scam: पार्थ पवारांच्या कंपनीसाठी तहसीलदार येवलेंनी काय काय केलं? धक्कादायक पुरावे उघड
4

Pune Land Scam: पार्थ पवारांच्या कंपनीसाठी तहसीलदार येवलेंनी काय काय केलं? धक्कादायक पुरावे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.