शेवगाव : ‘आज आपला पक्ष संकटात आहे. पक्ष नेतृत्वाला भाजप व बंडखोर आमदार जाणीवपूर्वक लक्ष्य करीत आहे. त्यामुळे आपण सर्व नव्या दमाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि शेवगाव तालुक्यातील शिवसैनिक शेवटपर्यंत त्यांच्याशी प्रामाणिक राहील’, असे शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश मगरे (Avinash Magare) यांनी म्हटले आहे.
शेवगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहावर शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश मगरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये बंडखोर आमदारांचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी मगरे बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ कुसळकर, भारत लोहकरे, शेवगाव शहरप्रमुख सिद्धार्थ काटे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, प्रा. शिवाजीराव काटे, जिल्हा उपसंघटक महिला आघाडी मंदाकिनी कुलकर्णी, तालुका उपप्रमुख देविदास चव्हाण, कुलकर्णी आप्पा, किसनराव डाके, पांडुरंग नामदेव नाबदे, सुधाकर सांगळे, युवा सेना तालुका प्रमुख शीतल पुरनाळे, शहर प्रमुख महेश मिसाळ, ज्ञानेश्वर धनवडे, अशोक गवते, चंद्रशेखर ढवळे अक्षय बोडखे, प्रा. अशोक शिंदे इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.






