सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफीच्या सेवनाशिवाय दिवसाची चांगली सुरुवातच होत नाही. पण उपाशी पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्यामुळे अपचनाच्या समस्या वाढू लागतात आणि आरोग्य बिघडून जाते. कॅफिन असलेल्या पेयांचे वारंवार सेवन केल्यामुळे केवळ पचनाच्या समस्यांचं नाहीतर झोप आणि संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे चहा पिण्याऐवजी फुलांचा चहा बनवून प्यावा. यामुळे शरीर आणि त्वचेला खूप जास्त फायदे होतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या फुलांचा चहा शरीरासाठी फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य – istock)
रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! 'या' फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला चहा त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. या चहामध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील ग्लो वाढवतात. या चहाची चव सौम्य आणि मनमोहक असते.

जास्वदींच्या पाकळ्यांचा वापर करून बनवलेला हर्बल चहा नियमित प्यायल्यास अपचनाच्या समस्या उद्भवणार नाहीत. या चहाची चव किंचित आंबट लागते.

चमेलीच्या फुलांचा चहाची चव वाढवतो. हलका फ्लेवर्ड चहा आवडणाऱ्यांसाठी चमेलीच्या फुलांचा चहा अतिशय उत्तम आहे.

गोकर्णाची फुले बाजारात सहज उपलब्ध होतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा गोकर्णाच्या फुलांचा हर्बल चहा बनवून तुम्ही पिऊ शकता.

लॅव्हेंडरच्या खाद्य फुलांचा वापर करून बनवलेला हर्बल चहा आठवड्यातून एकदाच प्यावा. याशिवाय वारंवार हर्बल चहा पिणे टाळावे. अन्यथा शरीरसंबंधित गंभीर समस्या वाढू शकतात.






