Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News: प्रदेशाध्यक्षांसमोरच सांगली भाजप नेत्यांचा राडा; आयात उमेदवारांवरुन जोरदार संघर्ष

नवा-जुना वाद, पक्षातील गट-तट यातून एकमत होण्यास अडचणी येत असल्याने उमेदवारीबाबतचा वाद थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यापर्यंंत पोहोचला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 27, 2025 | 11:05 AM
Sangali BJP Politics

Sangali BJP Politics

Follow Us
Close
Follow Us:
  • महापालिका निवडणुकीचे वातावरण तापले
  • भाजपमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीवरुन अंतर्गत कलह
  • नाराज होऊन आमदार बैठकीतून निघून गेले
Sangali News: महापालिका निवडणुकीचे वातावरण तापले असताना मुंबईत भाजपची उमेदवारी निश्चित करण्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत प्रदेशाध्यांसमोरच नेते एकमेकांना भिडले. विद्यमान उमेदवारांचा पत्ता कट करण्यासह आयात उमेदवारांना पसंती देण्यात येत असल्याच्या कारणावरुन वाद उफाळून आला. माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नसल्याचा राग मनात धरुन तुम्हांला जे काय करायचे ते करा असे ठणकावत पक्षाचे जेष्ठ आमदार बैठकीतून निघून गेले. काही नेत्यांनी उमेदवारी द्या अन्यथा स्वतंत्र लढू असा इशारा दिला. त्यामुळे बैठकीत चांगलाच तणाव निर्माण झाला.

Ajit Pawar Not Reachable: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार? अजित पवार पुन्हा ‘नॉट रिचेबल

भाजपमध्ये (BJP) मागील काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीवरुन अंतर्गत कलह सुरु आहे. याबाबत मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी गुरुवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि जेष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. प्रदेशाक्षांसमोर झालेल्या बैठकीत नेत्यांतील वाद चांगलाच उफाळून आला.

नवा-जुना वाद, पक्षातील गट-तट यातून एकमत होण्यास अडचणी येत असल्याने उमेदवारीबाबतचा वाद थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यापर्यंंत पोहोचला होता. दिग्गज नेत्यांसमोर जागांचा तिढा सुटेल असा विश्वास नेत्यांचा होता. परंतु उमेदवारी जागा वाटप करताना प्रदेशाध्यांसमोरच स्थानिक नेत्यांचा वादाला तोंड फुटले. काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या गटाला जागा देण्यावरुन चर्चेला सुरुवात झाली. पक्ष प्रवेशकरतेवेळी नेत्यांना काही आश्वासने देण्यात आली आहेत. ती आपल्याला पाळायला हवीत, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे पक्षातील नेत्यांना जागा वाटप करताना जुळवून घ्यावे लागेल, असेही सूचित करण्यात आले.

Pune Politics: दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्या; पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

नाराज होऊन आमदार बैठकीतून निघून गेले

नव्या नेत्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना जागा दिल्या जाणार असतील तर भाजपच्या जुने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कशी संधी दिली जाणार याबाबत स्पष्टता करण्याची मागणी जेष्ठ आमदारांनी केली. महिला नेत्याच्या गटाला सात ते नऊ जागा देण्याबाबत नेत्यांत एकमत झाले. मात्र आमदारांच्या कार्यकर्त्यांना स्थान मिळणार नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तुम्हांला जे काय करायचे ते करा, असे सांगत बैठकीतून निघून गेल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. याबाबत सांगलीच्या आमदारांनी अद्याप अधिकृतपणे कोणताही खुलासा केलेला नाही. (Maharashtra Municipal Election 2025)

उमेदवारी जाहीर करताना अनेक विद्यमान आणि अनुभवी उमेदवारांचा पत्ता करण्यात येत आल्याबद्दल काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. आमच्या प्रभागात उमेदवारी देण्यात यावी. तसेच पॅनेलमध्ये स्थानिक नेत्यांची मत विचारात घेवूनच निश्चित करण्याची विनंती करण्यात आली. पॅनेल तयार करताना विश्वासात घेणार नसल्यास आम्ही स्वतंत्र लढू, असा इशाराही काही मंडळींनी दिल्याची चर्चा सुरु आहे. उमेदवारी निश्चित करताना वाद विकोपाला गेल्याचे लक्षात येताच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पक्षाच्या सर्वच नेत्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे.

30 रोजी यादी

दरम्यान उमेदवारी निश्चित करताना भाजपमधील अनेक इच्छुकांची निराशा होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे. भाजपमधील नाराज विरोधकांच्या हाताला लागू नयेत, यासाठी भाजपची उमेदवारी यादी अधिकृतपणे जाहीर करण्यास विलंब होणार असल्याचे चित्र आहे. असे असले तरी काही प्रभागात भाजपच्या उमेदवारांची यादी निश्चित झाली असून कामाला लागा असे तोंडी आदेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी मंगळवारी (दि. 30) रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

आजच्या दिवशी पहिल्यांदा गायले गेले भारताचे राष्ट्रगीत ‘जन गन मन’ ; जाणून घ्या २७ डिसेंबर रोजीचा इतिहास

महिला नेत्याचा आत्मदहनाचा इशारा

मुंबईत भाजप उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा सुरु होती. पक्षाच्या जेष्ठ महिला नेत्यांनी माझ्या प्रभागात माझ्या मुलाला उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. नव्याने प्रवेश केलेल्या तरुण नेत्याच्या उमेदवारीवर माझा आक्षेप आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हांलाच उमेदवारी देण्यात यावी, अन्यथा प्रदेश कार्यालयासमोर आत्मदहन करु, अशी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकारानंतर संबंधित जेष्ठ नेत्यांनी महिला नेत्याची मनधरणी केली असल्याचे समजते.

 

 

Web Title: Bjp leaders clash over candidate selection tension in bjp camp as leaders threaten to contest independently

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Municipal Corporation Election
  • Sangali Politics

संबंधित बातम्या

Campaign Rallies of Hindutva leaders: ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी; हिंदुत्ववादी नेत्यांच्या घेणार प्रचारसभा
1

Campaign Rallies of Hindutva leaders: ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी; हिंदुत्ववादी नेत्यांच्या घेणार प्रचारसभा

BJP Brahmin MLA meeting : जातीवर आधारित राजकीय समीकरणे! भाजपच्या 40 ब्राम्हण आमदारांची चार तास बैठक
2

BJP Brahmin MLA meeting : जातीवर आधारित राजकीय समीकरणे! भाजपच्या 40 ब्राम्हण आमदारांची चार तास बैठक

Vidarbha Municipal Election: चारही महानगरपालिकांत महायुतीचा निर्णय; उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होणार: चंद्रशेखर बावनकुळे
3

Vidarbha Municipal Election: चारही महानगरपालिकांत महायुतीचा निर्णय; उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होणार: चंद्रशेखर बावनकुळे

भाजपकडे नाही देणाऱ्यांची कमी…! पॉलिटिक डोनेशनने भाजप नेत्यांचे भरले खिसे
4

भाजपकडे नाही देणाऱ्यांची कमी…! पॉलिटिक डोनेशनने भाजप नेत्यांचे भरले खिसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.