आजच्या दिवशी पहिल्यांदा गायले गेले भारताचे राष्ट्रगीत 'जन गन मन' ; जाणून घ्या २७ डिसेंबर रोजीचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज २७ डिसेंबर, आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या. त्यातीलच एक अभिमानास्पद बाब म्हणजे आजच्या दिवशी १९११ मध्ये आपल्या भारताचे राष्ट्रगीत जन गन मन हे पहिल्यांदा गायले गेले होत. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले हे राष्ट्रगीत अर्थात जन गन मन हे पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ मध्ये कोलकाता इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात हे गाण्यात आले होते. हे गीत रवींद्रनाथ टॉगोर यांनी प्रथम बंगाली भाषेत लिहिले आहे. आजच्या दिनानिमित्त आपण इतिहासात घडलेल्या काही इतर घटन देखील जाणून घेऊयात. यासाठी खालील दिलेली माहिती वाचा.






