Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत; राहुल कुल यांची मागणी

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० (आयटी ऍक्ट  2000) लागू करण्यात आला आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने गुन्हेगारांना वाव मिळतो आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 03, 2025 | 02:35 AM
Cyber Crime: सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत; राहुल कुल यांची मागणी

Cyber Crime: सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत; राहुल कुल यांची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

दौंड: सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली आहे. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांचा वापर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या प्रगतीमुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर वाढले असून, नागरिकांना मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांची विधानसभेत केली आहे.

यावेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले , २०२४ मध्ये राज्यभरात ८,९४७ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पुण्यात सर्वाधिक ६,७०७ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, तर मुंबईत सर्वाधिक ४,८४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. बनावट पोलिस किंवा एटीएस अधिकारी बनून नागरिकांना फोन करून हेरगिरीच्या आरोपाखाली खंडणी मागण्याचे, तसेच एआयचा वापर करून नागरिकांना घाबरवण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे महिलांवर, लहान मुलांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर विशेष धोका निर्माण झाला आहे. अनेक प्रकरणांमध्ये आर्थिक नुकसान, मानसिक त्रास आणि आत्महत्येपर्यंतची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये डेटा चोरी, हॅकिंग, आर्थिक फसवणूक, सायबर स्टॉकिंग, फेक ई-मेल्स, सोशल मीडिया द्वारे फसवणूक, चाईल्ड पोर्नोग्राफी, मॉर्फिंग, डिफेमेशन आदी प्रकारांचा समावेश आहे. ही समस्या केवळ तांत्रिक नसून, सामाजिक आणि आर्थिक आव्हान ठरत आहे.
राज्यात सायबर गुन्ह्यांची उकल केवळ २५% असून, प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याला सायबर गुन्ह्यांविषयी प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी सायबर सेल, सायबर पोलिस स्टेशनची स्थापना करावी, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे. तसेच, प्रत्येक छोट्या-मोठ्या सायबर गुन्ह्यांचा तपास सायबर पोलिसांनीच करावा आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० (आयटी ऍक्ट  2000) लागू करण्यात आला आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने गुन्हेगारांना वाव मिळतो आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच ८३८ कोटी रुपयांची गुंतवणूक करून सायबर सुरक्षेसाठी व्यापक पावले उचलली आहेत. यामध्ये २४ बाय ७ संपर्क केंद्र, मोबाईल अ‍ॅप, ऑनलाइन पोर्टल, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ, सायबर प्रयोगशाळा, आणि CERT-MH (Computer Emergency Response Team-Maharashtra) यांचा समावेश आहे. पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आमदार राहुल कुल यांनी राज्य सरकारने सायबर गुन्हेगारीविरोधात अधिक कठोर आणि प्रभावी पावले त्वरित उचलावीत, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी हे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Bjp mla demand state government takes strict action to stop cyber crime maharashtra vidhansabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • cyber crime
  • Fraud Case
  • Rahul Kul

संबंधित बातम्या

Valentine’s Day येतोय, जरा जपून…! ‘रोमान्स स्कॅम’चा धोका, प्रेमाच्या नावाखाली होतेय फसवणूक
1

Valentine’s Day येतोय, जरा जपून…! ‘रोमान्स स्कॅम’चा धोका, प्रेमाच्या नावाखाली होतेय फसवणूक

डिजीटल क्रांतीकडे एक पाऊल जातोय पुढे…; मात्र सायबर क्राईमचा धोका आजही कायम
2

डिजीटल क्रांतीकडे एक पाऊल जातोय पुढे…; मात्र सायबर क्राईमचा धोका आजही कायम

कुल यांचा ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल अपयशी; राहू–खामगाव, खडकी–देऊळगाव जिल्हा परिषद गटात भाजपचा पराभव
3

कुल यांचा ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल अपयशी; राहू–खामगाव, खडकी–देऊळगाव जिल्हा परिषद गटात भाजपचा पराभव

Mumbai Cyber Crime: मुंबईत हाय-प्रोफाईल फसवणूक; शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ६६ लाख लुटले
4

Mumbai Cyber Crime: मुंबईत हाय-प्रोफाईल फसवणूक; शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ६६ लाख लुटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.