Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वीज समस्या सोडवण्यासाठी भाजप आमदार महेश लांडगे यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

भोसरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत औद्योगिक आणि घरगुती वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महावितरण प्रशासनाने पायाभूत सुविधा सक्षम कराव्यात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 20, 2023 | 07:08 PM
वीज समस्या सोडवण्यासाठी भाजप आमदार महेश लांडगे यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत औद्योगिक आणि घरगुती वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महावितरण प्रशासनाने पायाभूत सुविधा सक्षम कराव्यात. तसेच, प्रस्तावित प्रकल्प आणि विकासकामे मार्गी लावावीत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भोसरी विधानसभा मतदारसंघात औद्योगिक आणि निवासी अशा दोन्ही पट्ट्यातील वीज ग्राहकांना नियमितपणे वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. समाविष्ट गावांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली असून, त्या तुलनेत वीज यंत्रणा सक्षम करण्यात आलेली नाही. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही विकासकामे तात्काळ मार्गी लावणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारकडे खालीलप्रमाणे कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास सदर कामे मार्गी लावता येतील.

यामध्ये प्राधान्याने सफारी पार्क मोशी अतिउच्चदाब (ई.एच.व्ही.) उपकेंद्र उभारण्यात यावे. त्याळे मोशी, डुडुळगांव, आकुर्डी, चिखली, तळवडे या भागातील औद्योगिक व निवासी पट्टयातील वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. चऱ्होली अतिउच्चदाब (ई.एच.व्ही.) उपकेंद्र उभारण्यात यावे. ज्यामुळे भोसरी, चऱ्होली, दिघी, धानोरी या भागात पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी मदत होणार आहे. भोसरी गावठाणे येथील नवीन स्विचिंग उपकेंद्र, ओव्हरहेड वीज वाहिन्याचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रुपांतर करणे, तळवडे येथील देवी इंद्रायणी स्विचिंग उपकेंद्रातून स्वतंत्र फिडर बे व भूमिगत काम तातडीने करण्याची योजना राबवणे, नवीन उपविभाग व शाखा कार्यालय स्थापित करणे अत्यावशक आहे, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

भोसरी उपविभागाचे दोन उपविभाग होणार

भोसरी विभागांतर्गत भोसरी एमआयडीसी तसेच सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकीरण झाले आहे. औद्योगिक, घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांची संख्याही वाढलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी कुशल प्रशासकी नियंत्रणासाठी भोसरी उपविभागाचे दोन उपविभाग करणे गरजचे आहे. भोसरी उपविभाग क्र. १ अंतर्गत भोसरीगांव शाखा, नाशिकरोड शाखा कार्यालय आणि चऱ्होली शाखा कार्यालय स्थापन करणे आवश्यक आहे.

तसेच, भोसरी उपविभाग क्र. २ अंतर्गत इंद्रायणीनगर शाखा कार्यालय (नवीन प्रस्तावित), मोशी शाखा कार्यालय, आकुर्डी उपविभाग अंतर्गत चिखली शाखा कार्यालय (नवीन प्रस्तावित) उभारण्याची आवश्यकता आहे. याबाबत ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महावितरण पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याला गती मिळेल, अशी अपेक्षा आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Bjp mla mahesh landge request to dy cm devendra fadnavis to solve electricity problem nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2023 | 07:08 PM

Topics:  

  • BJP
  • Development Work
  • devendra fadnavis
  • mahesh landge
  • Pimpri
  • Pimpri Chinchwad
  • Pune

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक
1

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
3

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
4

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.