Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Elections : वडगाव मावळमध्ये प्रचाराचा धुराळा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची खास उपस्थित

डगाव कातवी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांच्या प्रचाराचा धुराळा उडाला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 23, 2025 | 03:52 PM
BJP Ravindra Chavan campaign of Mahayuti candidate Mrunal Mhalaskar for the post of mayor

BJP Ravindra Chavan campaign of Mahayuti candidate Mrunal Mhalaskar for the post of mayor

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Local Body Elections : वडगाव मावळ: राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणूका पार पडत आहे. यामुळे राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून महायुती, महाविकास आघाडीसह अपक्ष नेत्यांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. वडगाव कातवी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांच्या प्रचाराचा धुराळा उडाला.

भाजप–शिवसेना महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांच्यासह 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचार मोहिमेचा भव्य शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी  ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचे दर्शन घेत आणि नारळ फोडून प्रचार मोहिमेला प्रारंभ झाला. त्यानंतर खंडोबा मंदिरापासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान ढोल ताशांचा गजर, घोषणाबाजी, भगवे झेंडे आणि शेकडो कार्यक्रमांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. हजारो महिला आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती ही या रॅलीची खास वैशिष्ट्य ठरली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रभारी भास्करराव म्हाळसकर तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रवींद्र चव्हाण यांचे भाषण

वडगाव मावळमध्ये जोरदार प्रचार सुरु झाला. यासाठी महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन करताना उमेदवारांचे मनोबल वाढवले. त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला. यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, “भ्रष्टाचारमुक्त वडगावसाठी भाजपाशिवाय पर्याय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वडगावमध्ये परिवर्तनाची नवी पहाट उगवेल,”असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. वडगाव आणि डोंबिवलीमधील विशेष नात्याची आठवण करून देत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना भरभरून प्रोत्साहन दिले आणि संघटनेच्या ताकदीच्या जोरावर विजय निश्‍चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नगराध्यक्षपदासाठी ‘म्हाळसकर विरुद्ध ढोरे’ ?

नगराध्यक्ष पद महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने प्रमुख राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा या पदावर लागणार आहे.म्हाळसकर कुटुंबातील मृणाल गुलाबराव म्हाळसकर (२ अर्ज), सुनंदा गुलाबराव म्हाळसकर, सायली रुपेश म्हाळसकर या तिघींनी दाखल केलेल्या अर्जांमुळे घराण्यातील अंतर्गत शक्तीपरीक्षेची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगली आहे.

मतदार जनजागृती जोमदार — SVEEP उपक्रम रंगात

मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी नगरपंचायतीने SVEEP मोहिमेला मोठा वेग दिला आहे. LED स्क्रीन व्हॅन, विद्यार्थी प्रतिज्ञा, गर्दीच्या ठिकाणी जनजागृती यामुळे शहरभर निवडणुकीचे वातावरण भारावून गेले आहे.

Web Title: Bjp ravindra chavan campaign of mahayuti candidate mrunal mhalaskar for the post of mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • maval news
  • political news

संबंधित बातम्या

Malegaon Election : मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा! मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनोखी जनजागृती मोहीम
1

Malegaon Election : मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा! मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनोखी जनजागृती मोहीम

Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू
2

Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले
3

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Maharashtra Politics: “कुणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात…”; राज ठाकरे काय बोलून गेले?
4

Maharashtra Politics: “कुणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात…”; राज ठाकरे काय बोलून गेले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.