Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Elections 2025: मिशन महापालिकेसाठी भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू..; शिंदे पवारांची धाकधुक वाढली

महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शहांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेतला आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्यासाठी त्यांनी पक्षातील नेत्यांना सुचनाही दिल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 28, 2025 | 10:00 AM
Local Body Elections 2025: मिशन महापालिकेसाठी भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू..; शिंदे पवारांची धाकधुक वाढली
Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Local Body Elections News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकांसाठी राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यातील प्रमुख महापालिकाच्यां निवडणुकांसाठी भारतीय जनात पक्षाने मोठी तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे यावेळी भाजप या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचे कारण म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमिक शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे हे तीनही दिवस ते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. पण यातही त्यांनी या तीन महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.

तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शाहांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी चाचपणी करण्याच्या सुचना दिल्याचे सांगण्यात आले आहेत. दुसरीकडे मुंबई आणि ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी ताकद आहे. तर पुण्यात अजित पवार यांचीही ताकद आहे. त्यामुळे भाजप याठिकाणी स्वबळावर लढू शकते का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या – चांदीच्या किंमतीत पुन्हा झाली घसरण, खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

दरम्यान, काल (27 मे) एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेत १०७ जागा मागितल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये सद्या २२७ प्रभाग आहेत. त्यातील १०७ प्रभागात शिंदे गटाचे उमेदवार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. अमित शाहांनी एकनाथ शिंदेंची बाजू ऐकून घेतली असली तरी त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन मात्र दिले नसल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शहांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेतला आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्यासाठी त्यांनी पक्षातील नेत्यांना सुचनाही दिल्या आहेत. पण आता शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे भाजपची ताकद वढली आहे. २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरले होते. त्यावेळी भाजपला ९२, तर शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, सध्याच्या स्थितीत शिवसेना दोन गटांत विभागली गेल्याने भाजपची तुलनात्मक ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच भाजपकडून स्वबळावर लढण्याचा पर्याय गांभीर्याने तपासला जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

नागपूर हिंसाचारप्रकरणी मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; फहीम खानवर देशद्रोहाचा ठपका कायम

गेल्या तीन वर्षांत ठाकरे गटाला धक्का देत, मुंबईतील अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश केला आहे. २०१२ आणि २०१७ मधील पालिका निवडणुकांत विजयी झालेले शंभरहून अधिक माजी नगरसेवक सध्या शिंदे गटात आहेत. पालिका निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळेल, या आश्वासनावर त्यांनी ठाकरे गट सोडला आहे. त्यामुळे या नगरसेवकांना नाराज करता येणार नाही आणि दिलेला शब्द पाळावाच लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल्याची  माहिती आहे.

 

Web Title: Bjp starts testing its strength for mission municipal corporation shinde pawars fear increases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 10:00 AM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • BMC
  • Local Body Elections 2025

संबंधित बातम्या

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं
1

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
2

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
3

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
4

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.