बीएमसी निवडणूक 2026 साठी महायुती भाजपचा मुंबई जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला (फोटो - एक्स)
महायुतीचा जाहीरनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाईचे प्रमुख रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षातील मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना खास आश्वासने आणि योजना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर चाकरमानी मुंबईकराच्या प्रवासासाठी अनेक निर्णय घेतले जातील असे आश्वासन देण्यात आले आहे. जाहीरनाम्यामध्ये लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या सोयीसाठी तीन डब्बे वाढवण्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर एसीचे डबे करुन सेकंड क्लासच्या तिकीटात वाढ करणार नाही. २१ ठिकाणी जेट्टी तयार करणार. वॉटर टॅक्सी आणणार आहोत. स्वस्तात प्रवास करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : लाडक्या बहिणी’पासून पर्यावरण प्राधिकरणापर्यंत; महायुतीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार
त्याचबरोबर आता एका तिकीटावरून मेट्रो, मोनो, रेल्वे बसमधून जाता येतं. आता याच तिकीटावरून वॉटर टॅक्सीतून जाता येणार आहे. यामुळे सामान्य नोकरदार मुंबईकराचा वेळ वाचेल. तसेच मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करणार असून सिमेंटचे रस्ते बांधण्यावर जोर देण्यात येणार आहे. तसेच पुढचे ३०-४० वर्ष रस्त्यांवर कधीच खड्डे पडणार नाही अशी उपाययोजना असल्याचे देखील महायुतीच्या वचननाम्यामध्ये सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा : पुणेकरांचा नाद नाही! लाडक्या बहिणींच्या पैशांचा उल्लेख करत मागितले मत; थेट केली आमदारांविरोधात तक्रार
याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईतील मराठी माणूस हा मुद्दा गाजला आहे. यासाठी महायुतीने आपल्या वचननाम्यातून योजनांची खैरात वाटली. महायुतीच्या वचननाम्यामध्ये मराठी माणसांसाठी खास उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी माणूस हा उपनगरात गेला आहे. त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पुनर्विकास राबवताना येणारे अडथळे दूर केले आहे. एसआरए, म्हाडाच्या इमारती, सेसच्या इमारती, नॉन सेसच्या इमारतीचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टीत दरवर्षी ८ टक्के वाढ होते. आम्ही पाच वर्षासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईला प्रदूषण मुक्त करण्याचं काम केलं आहे. मुंबई खड्डे मुक्त करणार आहोत. आम्ही फक्त मांडून थांबणार नाही. त्याची अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.






