Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: वाई तालुक्यात बोरीव-आकोशी रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’; दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?

विशेषतः दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून जाताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. किरकोळ अपघातांची संख्या वाढत असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 15, 2026 | 04:39 PM
Wai taluka Boriv Akoshi road accident risk 2026, Satara PWD negligence road repair

Wai taluka Boriv Akoshi road accident risk 2026, Satara PWD negligence road repair

Follow Us
Follow Us:
  • बोरीव ते आकोशी मार्गावरील साईडपट्टीची अत्यंत दयनीय अवस्था
  • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान आणि बेजबाबदार कारभारामुळे रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे उखडली गेली
  • प्रशासनाने तातडीने साईडपट्टी दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही तर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल
Satara Politics : पश्चिम भागातील वाई तालुक्यातील बोरीव ते आकोशी मार्गावरील साईडपट्टीची अत्यंत दयनीय अवस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या मुख्य पृष्ठभाग आणि साईडपट्टीमध्ये मोठी उंचीची तफावत निर्माण झाल्याने हा मार्ग अक्षरशः “मृत्यूचा सापळा” बनला आहे. अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

विशेषतः दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून जाताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. किरकोळ अपघातांची संख्या वाढत असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

‘दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा, स्वतःचे कार्यकर्ते मोठे करा,’ शर्मिला ठाकरेंचा पक्षफोडीवरून भाजप, आरएसएस वर निशाणा

ग्रामस्थांच्या मते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान आणि बेजबाबदार कारभारामुळे रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे उखडली गेली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास मोठे अपघात होऊ शकतात. तरीदेखील संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सातारा, तहसीलदार वाई, वाई पोलीस स्टेशन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Amravati News: वृक्षांसाठी उभे राहिलेले हात जिंकले! आराखडा तयार; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे

ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रशासनाने तातडीने साईडपट्टी दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही तर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल. संभाव्य अपघातांमध्ये जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

“अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे. बोरीव-आकोशी रस्त्यावरील धोकादायक स्थितीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

 

 

Web Title: Boriv akoshi road turns into a death trap due to pwd negligence near wai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • Marathi News
  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

Power Cut In Summer: उन्हाळ्यात वीज का जातेय? घराघरांतील ‘हा’ निष्काळजीपणा वीज कंपन्यांची वाढवतोय डोकेदुखी
1

Power Cut In Summer: उन्हाळ्यात वीज का जातेय? घराघरांतील ‘हा’ निष्काळजीपणा वीज कंपन्यांची वाढवतोय डोकेदुखी

नदीतील गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूचोरी? अस्तान येथील कामावर शिवसेना तालुकाप्रमुखांचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी
2

नदीतील गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूचोरी? अस्तान येथील कामावर शिवसेना तालुकाप्रमुखांचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी

उद्या 16 जूनला Share Market आणि Bank सुरू आहेत की बंद? मुहर्रमच्या सुट्टी नेमकी कधी? कन्फ्युजन दूर करा…
3

उद्या 16 जूनला Share Market आणि Bank सुरू आहेत की बंद? मुहर्रमच्या सुट्टी नेमकी कधी? कन्फ्युजन दूर करा…

फक्त 15 दिवस… काळा पैसा भारतात परतणार! परदेशात जमा मालमत्तेवर सरकार नियम आणण्याच्या तयारीत
4

फक्त 15 दिवस… काळा पैसा भारतात परतणार! परदेशात जमा मालमत्तेवर सरकार नियम आणण्याच्या तयारीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.