Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नदीतील गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूचोरी? अस्तान येथील कामावर शिवसेना तालुकाप्रमुखांचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील कांदोशी, हुंबरी, सवेणी, अस्तान व मुसाड या पाच ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र अस्तान गावातील नदीपात्रातील गाळ काढताना मोठ्या प्रमाणावर वाळू गायब झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 15, 2026 | 07:18 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील कांदोशी, हुंबरी, सवेणी, अस्तान व मुसाड या पाच ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र अस्तान गावातील नदीपात्रातील गाळ काढताना मोठ्या प्रमाणावर वाळू गायब झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडगे यांनी केला आहे.

Ratnagiri Politics: ठाकरे सेनेला रत्नागिरीत मोठा धक्का! जिल्हा संपर्क प्रमुख ‘भाजप’च्या वाटेवर

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अस्तान येथे नदीपात्राची पाहणी केल्यानंतर बोलताना सचिन धाडगे म्हणाले की, नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा उपयोग केवळ वाळू उपशासाठी करण्यात आला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. नदीतील गाळासह वाळूही गायब झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत चौकशीची मागणी करण्यात येणार आहे.
नदीपात्रातून काढण्यात आलेला गाळ व मोठे दगड नदीकाठावरच टाकण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात पावसाळ्यात हा गाळ शेतांमध्ये वाहून जाऊन शेतीचे अधिक नुकसान होण्याची शक्यता असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्याचेही त्यांनी सांगितले. बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीदेखील करण्यात येणार असल्याचे धाडगे यांनी स्पष्ट केले.

कामाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न

दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या आदेशानुसार आम्ही पाहणीसाठी आलो असता अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या. स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून या कामाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदाराने केल्याचा आरोपही त्यांनी केला. कामाबाबत जाब विचारण्यासाठी सकाळपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत शिवसेना पदाधिकारी संबंधित ठेकेदाराची वाट पाहत होते. मात्र ठेकेदार घटनास्थळी उपस्थित राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी

या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे धाडगे यांनी सांगितले.यावेळी महायुतीतील कथित श्रेयवादाबाबत विचारले असता, “खेड तालुक्याचा विकास रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली झाला असून योगेशदादा कदमही विकासकामे प्रभावीपणे राबवत आहेत. मात्र काही राजकीय पुढाऱ्यांना ही विकासकामे पाहवत नसल्याने श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, अस्तान येथील नदीतील गाळ काढण्याच्या कामातून वाळूचोरी झाल्याचा आरोप पुढे आल्याने तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून चौकशीत नेमके सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता विद्यार्थ्यांना मिळणार एसटीचे डिजिटल ‘रूपे कार्ड’; सवलतीच्या दरात तिकीट मिळणार

Web Title: Khed sand theft allegations in river desiltation work at astan marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • Business News
  • Dapoli
  • Marathi News
  • Ratnagiri
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान
2

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
4

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.