नवी मुंबई : तुर्भे (Turbhe) येथील कापड गोदामाला (Cloths Godown) आज आग (Fire) लागली असून तिचे स्वरूप मोठे आहे. गोदामातील सर्व माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल (Two fire engines reached the spot) झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
[read_also content=”मैत्रिणींसोबत मसुरीला फिरायला गेली आहे, फोन माझ्याकडे आहे…, निक्कीच्या वडिलांची दिशाभूल करत होता साहिल; असा झाला रहस्याचा उलगडा https://www.navarashtra.com/india/delhi-crime-news-nikki-yadav-murder-case-update-sahil-gehlot-was-misleading-nikki-father-see-the-details-here-nrvb-369928.html”]
नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आतील कामगार वेळीच बाहेर आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.






