Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरडा दुष्काळ तत्काळ जाहीर करा, शेतकरी मदतीसाठी शिवसेनेचा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

dry Drought Ubt Shiv sena protest Buldhana: बुलढाणा जिल्ह्यात अत्यल्प आणि अनियमित पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 12, 2026 | 09:05 PM
dry Drought Ubt Shiv sena protest Buldhana

dry Drought Ubt Shiv sena protest Buldhana

Follow Us
Follow Us:
  • कोरडा दुष्काळ तत्काळ जाहीर करा
  • शेतकरी मदतीसाठी शिवसेनेचा एल्गार
  • जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बुलढाणा: शेतकऱ्यांसमोरील संकटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, यंदा जिल्ह्यात झालेल्या अत्यल्प व अनियमित पावसाचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मका, उडीद, ज्वारी यांसह विविध पिके करपली असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली.

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके तसेच मशागतीवर मोठा खर्च केला आहे. आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चात पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून पिकांचे पंचनामे करावेत आणि कोणतीही अट न ठेवता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच प्रलंबित कर्जमाफीच्या दुसऱ्या याद्या जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली.

तीव्र आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्यांना फीमाफी द्यावी, पशुधनासाठी चारा छावण्यांचा अग्रक्रमाने विचार करावा, तसेच वाढत्या महागाईच्या तुलनेत अपुरा ठरत असलेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वाढविण्याबाबत केंद्र शासनाकडे ठोस शिफारस करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास शिवसेनाच्या वतीने तीव आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा समन्वयक गजानन धांडे, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे, लखन गाडेकर, सुनील घाटे, गजानन उबरहंडे, विजय इतवारे, विजय इंगळे, गणेश रिंढे, सुनील भाग्यवंत, विजय राऊत, डॉ. अरुण पोफळे, संजय शिंदे, रामशंकर सोनुने, रवींद्र पवार, संजय गवळी यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इंदापुरात मोर्चेबांधणी; भरणेवाडीत सहकारातील दिग्गजांची संयुक्त बैठक

Web Title: Buldhana dry drought farmer relief shiv sena ubt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • buldhana news
  • Farmer Protest
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’
1

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश
2

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश

Buldhana News: ‘लेक लाडकी’ योजनेचा १२ हजार कुटुंबांना लाभ, मुलींच्या शिक्षणाला बळ; १४ हजार कुटुंबांची नोंदणी
3

Buldhana News: ‘लेक लाडकी’ योजनेचा १२ हजार कुटुंबांना लाभ, मुलींच्या शिक्षणाला बळ; १४ हजार कुटुंबांची नोंदणी

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन
4

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.