
Shiv Sena UBT Morcha
बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा दीर्घ खंड पडल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. शासनाने कोरडा दुष्काळाच्या बाचतीत घोषणा केली असली तरीही शब्द छल करत नेमकी काय मदत करणार हे सांगितलेलं नाही. त्यामुळे शासनाच्या या धोरणाचा निषेध करत शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या ही आग्रही मागणी शिवसेना पक्षाच्यावतीने करण्यात आली. हातात करपलेले सोयाबीन, ट्रॅक्टर बैलगाडीसह मदतीच्या मागणीचे फलक हातात घेऊन असलेले शेतकरी बांधव राज्य सरकारच्या फसव्या शासन निर्णयाविरोधात घोषणाबाजी करत या मोर्चात सामील झाले.
मंगळवारच्या मोर्चाने भगवा झंजावात बुलढाण्यात दिसून आला.जिजामाता प्रेक्षागार मैदानातून निघालेला या अति विराट मोचनि बुलढाणा दणाणून सोडले. कोरड्या दुष्काळाच्या मदतीवरून शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून आले. मोर्चा निघण्यापूर्वी जिजामाता प्रेक्षागार मैदानावर उपस्थित हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेत्यांनी हा लढा शेतकऱ्यांना थेट मदत मिळेपर्यंत थांबणार नाही असा गंभीर स्वरूपातला इशारा दिला. यावेळी अरविंद सावंत म्हणाले की, शेतकऱ्यांचा आक्रोश घेऊन आम्ही हा मोर्चा काढला आहे. देशात पहिल्यांदा संकट दिसले तेव्हा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे सर्वांत आधी यावर बोलले. विशेष अधिवेशन घेण्याची मागणी देखील केली.
आ. सिद्धार्थ खरात म्हणाले, फडणवीस सरकारने नुसता निर्णय काढून दुष्काळ घोषित केला. मात्र या निर्णयात दुष्काळात कुठली मदत करणार हे काही सांगितले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पंचनामाची नाटक बंद करून नुकसानभरपाई जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली. राज्य प्रवक्ता जयश्री शेळके यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम महायुती सरकार करत आहे. त्यामुळे तर आगामी काळात या सरकारला हा असंतोष सत्तेतून उलटवून टाकेल, असेही त्या म्हणाल्या. तर जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या सोबत आहे.
आ. नितीन देशमुख यांनी ३० वर्षात असे संकट आले नाही. सध्याकाळी चूल कशी पेटेल अशी परिस्थिती आज शेतक-यांच्या घरात देखील आहे, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून निवळ जुमलेबाजी सुरू आहे. हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितली मग आता कोरड्या दुाकाळामुळे वेट मदतीची अपेक्षा असताना शेतकरी हिंदू नाहीत का असा थेट सवाल करत आ. देशमुख यांनी सरकारवर हल्लाबोल केला. आज शेतक-यांच्या मुलांना शेतमजुरांच्या मुलांना रोजगार नाही. दुष्काळामुळे ही परिस्थिती आणखी भीषण होणार आहे. शिवसेना रस्त्यावर उतरली आणि पश्चिम विदर्भातून मार्च सुरू झाले तेव्हा सरकारला जाग आली. पण काढलेल्या शासन निर्णयात काय आहे हे राज्य सरकारने सांगितले नाही, शिवसेना रस्त्यावरचा हा लढ़ा आगामी काळात आणखी तीव्र करेल. प्रसंगी समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.