
photo- social media
Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?
तूर पिकावर प्रामुख्याने घाटे अळी (हेलिकोव्हर्पा), पिसारी पतंग आणि शेंगमाशी या ३ किडींचा प्रादुर्भाव आढळतो. घाटे अळीची मादी पतंग कळ्या, फुले आणि शेंगांवर अंडी घालते. त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या सुरुवातीला कळ्या व फुले खातात. पुढे शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे पोखरतात. पिसारी पतंगाची अळी शेंगांची साल खरवडून दाण्यांचे नुकसान करते, तर शेंगमाशीची अळी शेंगांच्या आत राहून दाणे कुरतडते. यामुळे दाण्यांची गुणवत्ता आणि उत्पादन घटण्याची शक्यता असते.
किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत. पक्ष्यांमार्फत अळ्यांचे नैसर्गिक नियंत्रण होण्यास मदत होते. तसेच घाटे अळीच्या निरीक्षणासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत. दोन ते तीन दिवसात एका सापळ्यात ५ ते ६ पतंग आढळल्यास, एका झाडावर एक अळी दिसल्यास किंवा ५ ते १० टक्के नुकसान झाल्यास नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. पिसारी पतंगाचे १० झाडांमध्ये ५ पतंग आढळणे, तसेच शेंगमाशीमुळे ५ ते १० टक्के दाणे नुकसानग्रस्त होणे, ही देखील प्रादुर्भावाची महत्त्वाची लक्षणे आहेत.
पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी किडींचा शिफारशीनुसार प्रादुर्भाव आणि खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी, इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी ६० ग्रॅम प्रति एकर, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी २०० मिली प्रति एकर, इथिऑन ५० टक्के ईसी ५०० मिली प्रति एकर, क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी : ६० मिली प्रति एकर.
कीटकनाशकाची फवारणी करण्यापूर्वी उत्पादनाच्या लेबलवरील सूचना, तूर पिकासाठीची नोंदणी आणि शिफारशीत मात्रा तपासावी, एकावेळी एकाच पर्यायाचा वापर करावा. फवारणी करताना वैयक्तिक संरक्षण साधने वापरण्यासह मधमाश्या आणि इतर उपयुक्त कीटकांचे संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी. नियमित पीक निरीक्षण आणि वेळीच योग्य उपाययोजना केल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
La Nina Effect: आता हे काय नवीन! तुफान पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता; एल निनोनंतर ला निनाचे संकट