Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: खरीप ई- पीक पाहणी नोंदणीला प्रारंभ; १० नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करा,जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Buldhana Kharif E-Peek Survey: बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी ‘केंद्रीय डीसीएस एमएच’ या नवीन मोबाइल अॅपद्वारे ई-पीक पाहणी व नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 02, 2026 | 05:46 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
  • बुलढाण्यात ई-पीक पाहणीला सुरुवात
  • अंतिम मुदत १० नोव्हेंबर
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी ‘केंद्रीय डीसीएस एमएच’ या नवीन मोबाइल अॅपद्वारे ई-पीक पाहणी व नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी १० नोव्हेंबरपूर्वी आपल्या पिकांची नोंदणी गावातील नियुक्त सहाय्यकाकडून वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले.महाराष्ट्र शासनाच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमिअभिलेख कार्यालयाच्या निर्देशानुसार पीक पाहणी व नोंदणी मोहिमेला ११ ऑगस्टपासून सुरुवात झाली. ही ई-पीक पाहणी अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रत्येक गावासाठी विशेष ‘पीक पाहणी सहाय्यका’ची नियुक्ती करण्यात आली.

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी केंद्रीय डीसीएस एमएच अॅपद्वारे एकूण ८ लाख ४१ हजार २९६ पीक पाहणी करावयाच्या मालकी प्लॉटपैकी ५ लाख ३० हजार २७९ प्लॉटवर संबंधित सहाय्यकांमार्फत ७/१२ वर पिकांची यशस्वी नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित क्षेत्रावर सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील नियुक्त सहाय्यकाकडून ई-पीक – पाहणी अॅपद्वारे पिकांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

१०० टक्के ई-पीक पाहणी नोंदणी बंधनकारक

पीक पाहणीची नोंदणी ‘केंद्रीय डीसीएस एमएच’ मोबाइल अॅपद्वारे थेट शेतावर जाऊन पिकांची नोंदणी करून माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. या सव्हें अंतर्गत १०० टक्के ई-पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये खरीप हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड अथवा चालू पड असलेल्या जमिनींची नोंद करणे आवश्यक आहे.

पीक विमा व शासकीय लाभासाठी अचूक नोंदणी आवश्यक

  • खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये ई-पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी न केल्यास ७/१२ उताऱ्यावरील ‘पीक पेरा’ कोरा राहील, जो नंतर भरता येत नाही.
  • यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, शासकीय अनुदान व इतर विविध योजनांचे लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
  • अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्यावेळी पीकविम्याचा लाभ मिळवण्यासाठी ७/१२ वर अचूक पीक नोंद असणे अत्यंत आवश्यक आहे.
Washim News: पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा; संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश

Web Title: Buldhana kharif 2026 e peek pahani registration 2026 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • buldhana news
  • Crisis on farmers

संबंधित बातम्या

Wardha Farmer : सिंचन विहिरीचे अनुदान २७ महिन्यांपासून रखडले; शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, प्रशासनाची धावपळ
1

Wardha Farmer : सिंचन विहिरीचे अनुदान २७ महिन्यांपासून रखडले; शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, प्रशासनाची धावपळ

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक
2

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी
3

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी

Buldhana: ३० टन कांद्याचा ट्रक पळवणारे गजाआड, ‘समृद्धी’वर चालकाला केली होती मारहाण; ट्रक अन् गुन्ह्यातील कार जप्त
4

Buldhana: ३० टन कांद्याचा ट्रक पळवणारे गजाआड, ‘समृद्धी’वर चालकाला केली होती मारहाण; ट्रक अन् गुन्ह्यातील कार जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.