Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: आधी अवैध रेती उपसा थांबवा, बोटी बंद करा; खडकपूर्णा प्रकल्पात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, प्रशासनाला थेट इशारा

Khadakpurna Project Affected Farmers motors Dispute: खडकपूर्णा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 22, 2026 | 08:47 PM
Khadakpurna Project Affected Farmers motors

Khadakpurna Project Affected Farmers motors

Follow Us
Follow Us:
  • खडकपूर्णा धरणावरून संघर्ष पेटला
  • शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
  • प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रशासनावर संताप
बुलढाणा: खडकपूर्णा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पाचे शाखा अभियंता राजगुरू, ठाणेदार रूपेश शक्करगे शुक्रवारी गेले असता शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत एकजुटीने अधिकाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडले. अखेर शेतकऱ्यांच्या एकजुटी पुढे आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना चर्चेचा मार्ग स्वीकारावा लागला.

खडकपूर्णा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संत शेतकऱ्यांच्या वर्षचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांचा रोज पाहता अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी आपला आक्रोश, व्यथा आणि अन्यायाची भावना अधिकाऱ्यांसमोर परखडपणे मांडली.  (Buldhana News)

Devendra Fadnavis : SMA Type 1 ग्रस्त यशश्रीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी थांबवला ताफा; उपचारांसाठी दिले मदतीचे निर्देश

ज्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी, घरे आणि संसाराचा त्याग केला, त्याच प्रकल्पाच्या पाण्यावर शेती करण्याची वेळ आली असताना सर्वप्रथम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्याच मोटारी बंद करण्याचा प्रशासनाचा अट्टाहास का ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. ‘आधी धरणातील बोटी बंद करा, रेतीचा अवैध उपसा थांबवा आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेलेल्या नाहीत त्यांच्या मोटारी अगोदर बंद करा; त्यानंतरच प्रकल्पग्रस्तांच्या मोटारींबाबत चर्चा करा,’ अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. ज्यांच्या जमिनी धरणात गेल्या, ज्यांचे घरदार उद्धवस्त झाले आणि ज्यांनी धरणासाठी मोठे योगदान दिले, अशा प्रकल्पग्रस्तांच्या मोटारींना हात लावण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारत धारेवर धरले की, आमच्या मोटारी बंद करण्यासाठी प्रशासन तत्परता दाखवते; मग धरणातील बोटी बंद करण्यासाठी अशीच तत्परता का दाखवली जात नाही ? अवैध रेती उपशामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? या बोर्टीच्या व्यवहारात कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

दरम्यान, ठाणेदार शकरगे यांनी कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याबाबत भूमिका मांडली. अधिकाऱ्यांना कोणताही निर्णय न घेता वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय कळविण्यात येईल, असे सांगून परतावे लागले. संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी तसेच लेखी स्वरूपात निर्वाणीचा इशारा दिला. या बैठकीला युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, मंडपगावचे सरपंच सचिन कदम, चिंचखेडचे सरपंच रामेश्वर वायाळ यांच्यासह इसरूळ, चिंचखेड, मंडपगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेती उपसा सुरू ठेवायचाच असेल तर महिनाभर मोटारी सुरू ठेवा

यावेळी शेतकऱ्यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी प्रशासनासमोर मांडली. जर प्रशासनाला धरणातील रेती उपसा आणि बोटींची वाहतूक तातडीने बंद करणे शक्य नसेल, तर किमान ऊस, अद्रक आणि हळद या पिकांची पूर्णपणे काढणी होईपर्यंत म्हणजेच पुढील एक महिना तरी शेतकऱ्यांच्या मोटारी सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.

सध्या ही पिके महत्त्वाच्या टप्प्यावर असून पाणी बंद केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. एकीकडे धरणातील रेती उपसा सुरू ठेवायचा आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करून त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घ्यायचा, हा दुजाभाव कदापि सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

Washim: पेनटाकळीत पाणीसाठा मुबलक, तरी वाशिमच्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम; शिवसेनेचा जलसंपदा विभागाला थेट इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: खडकपूर्णा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांनी विरोध का केला?

    Ans: शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांनी विरोध केला.

  • Que: शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे कोणती मागणी केली?

    Ans: धरणातील बोटी बंद कराव्यात आणि अवैध रेती उपसा थांबवावा, अशी मागणी केली.

  • Que: शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोणता इशारा दिला?

    Ans: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला.

Web Title: Khadakpurna project farmers protest illegal sand mining buldhana pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • buldhana news
  • Dam Water Level
  • Farmers Issues
  • Projects in Maharashtra

संबंधित बातम्या

Buldhana: मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकासाला वेग! पर्यटन महामंडळाचे अधिकारी मैदानात; प्रस्तावित कामांची पाहणी
1

Buldhana: मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकासाला वेग! पर्यटन महामंडळाचे अधिकारी मैदानात; प्रस्तावित कामांची पाहणी

Farmer News: खरीपने रडवले, आता रब्बीही धोक्यात! पाण्याअभावी शेतीचे नियोजन कोलमडले, नांदुऱ्यात शेतकरी संकटात
2

Farmer News: खरीपने रडवले, आता रब्बीही धोक्यात! पाण्याअभावी शेतीचे नियोजन कोलमडले, नांदुऱ्यात शेतकरी संकटात

Buldhana News: दुष्काळातही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीचा तगादा; पीडित महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
3

Buldhana News: दुष्काळातही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीचा तगादा; पीडित महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

बुलढाण्यात जनगणना २०२७ साठी प्रशासन सज्ज; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दोनदिवसीय प्रशिक्षण सुरू
4

बुलढाण्यात जनगणना २०२७ साठी प्रशासन सज्ज; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दोनदिवसीय प्रशिक्षण सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.