Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाण्याच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या सूचना; आमदार संजय गायकवाडांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

Buldhana Sanjay Gaikwad on Government Health Services: आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील आरोग्य योजनांचा आढावा घेत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 22, 2026 | 09:08 PM
Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad

Follow Us
Follow Us:
  • आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा
  • संजय गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
  • बुलढाण्यात आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर
बुलढाणा: आरोग्यविषयक विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आ. संजय गायकवाड यांनी सूचना केल्या.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक शनिवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला नगराध्यक्ष पूजा गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नीलेश जाधव, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, नायब तहसीलदार अशोक हिवाळे, गटशिक्षणाधिकारी दीपक येरमुले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, बुलढाणा व मोताळा तालुक्यांतील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ( Buldhana News)

Satara News : माण तालुक्यात चारा छावण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर! बिजवडीत २३ नोव्हेंबरला रास्ता रोको

या बैठकीत आमदार आणि अधिकाऱ्यांकडून ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या सर्व कामांचा तसेच आरोग्यविषयक विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण, आरोग्य संस्थांमधील उपलब्ध सुविधा, माता व बाल आरोग्य, नियमित लसीकरण, असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, नागरिकांची आरोग्य तपासणी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांनी प्रभावी नियोजन करून योजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच आरोग्य सेवा देताना नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याची आवश्यकता व्यक्त केली.

शासकीय विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे

आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागासह सर्व संबंधित शासकीय विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे बैठकीत नमूद करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरच्या नावाने बाहेरच्या स्ट्रॉबेरीची विक्री; GI टॅगचा गैरवापर करणाऱ्यांना कायदेशीर इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुलढाण्यात आरोग्य विभागाची बैठक कोणी घेतली?

    Ans: आमदार संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक झाली.

  • Que: बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

    Ans: आरोग्य सुविधा, माता-बाल आरोग्य, लसीकरण आणि शासकीय आरोग्य योजनांवर चर्चा झाली.

  • Que: आमदार संजय गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या?

    Ans: नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Buldhana sanjay gaikwad on government health services review pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news
  • Maharashtra Health Department
  • MLA Sanjay Gaikwad

संबंधित बातम्या

Buldhana: आधी अवैध रेती उपसा थांबवा, बोटी बंद करा;  खडकपूर्णा प्रकल्पात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, प्रशासनाला थेट इशारा
1

Buldhana: आधी अवैध रेती उपसा थांबवा, बोटी बंद करा; खडकपूर्णा प्रकल्पात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, प्रशासनाला थेट इशारा

Buldhana: मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकासाला वेग! पर्यटन महामंडळाचे अधिकारी मैदानात; प्रस्तावित कामांची पाहणी
2

Buldhana: मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकासाला वेग! पर्यटन महामंडळाचे अधिकारी मैदानात; प्रस्तावित कामांची पाहणी

Farmer News: खरीपने रडवले, आता रब्बीही धोक्यात! पाण्याअभावी शेतीचे नियोजन कोलमडले, नांदुऱ्यात शेतकरी संकटात
3

Farmer News: खरीपने रडवले, आता रब्बीही धोक्यात! पाण्याअभावी शेतीचे नियोजन कोलमडले, नांदुऱ्यात शेतकरी संकटात

Buldhana News: दुष्काळातही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीचा तगादा; पीडित महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
4

Buldhana News: दुष्काळातही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीचा तगादा; पीडित महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.