Khamgaon Cotton Farmer Training
भारतीय कापूस महामंडळाच्या अकोला शाखेचे सतर्कता अधिकारी सुनीलकुमार पात्रा, खामगाव केंद्राचे केंद्रप्रभारी आदित्य वामन, नितीन साकरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी, फॅक्टरी व्यवस्थापक संजूभाऊ घोगरे यांच्यासह परिसरातील शेतकरी या शिबिराला उपस्थित होते. शेतकऱ्यांना कापूस विक्रीच्या प्रक्रियेची माहिती मिळावी, तसेच महामंडळाच्या विविध उपक्रमांचा लाभ घेता यावा, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता. शिबिरादरम्यान भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘कपास किसान’ मोबाइल अॅपची सविस्तर माहिती देण्यात आली.
डिजीटल माध्यमांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस खरेदीशी संबंधित प्रक्रिया समजून घेणे सुलभ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध डिजिटल सुविधांची माहिती करून घेत त्यांचा प्रभावी वापर करावा, यावर मार्गदर्शन करण्यात आले. कापूस खरेदी व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे, शेतकऱ्यांना प्रक्रियेविषयी योग्य माहिती उपलब्ध करून देणे आणि गैरसमज दूर करणे, यासाठी जनजागृती महत्त्वाची असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसंदर्भातील नियम, प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांची माहिती वेळेवर घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
बदलत्या शेती परिस्थितीत उपलब्ध तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतींची माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरांची भूमिका महत्त्वाची ठरते. शेतकऱ्यांना कापूस उत्पादनाशी संबंधित तांत्रिक बाबी समजावून सांगण्यासोबतच त्यांच्या अडचणी जाणून घेण्यावरही भर देण्यात आला. सतर्कता जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या शिबिरात शेतकऱ्यांचे हित जपणे, कापूस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि डिजिटल सुविधांचा वापर वाढविणे या बावींना प्राधान्य देण्यात आले.
शेतकरी आणि संबंधित यंत्रणा यांच्यात माहितीची देवाणघेवाण वाढविणे, तसेच आधुनिक शेती पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग ठरला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी प्रक्रियेची योग्य माहिती मिळावी आणि उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेता यावी, यासाठी भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या जनजागृती उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले.
शिबिरात उपस्थित शेतकऱ्यांनी कापूस खरेदी प्रक्रिया आणि शेतीविषयक विविध समस्या मांडल्या. तसेच काही बार्बीबाबत शंका उपस्थित करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी आणि खरेदी प्रक्रियेबाबत स्पष्टता निर्माण व्हावी, या दृष्टीने संवाद साधण्यात आला.
कापूस उत्पादनात वाढ करण्यासाठी केवळ लागवड करणे पुरेसे नसून पिकाचे योग्य व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शास्त्रीय पद्धतींचा वापर महत्त्वाचा ठरतो. या पार्श्वभूमीवर शिबिरात कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसेच सघन लागवड पद्धती अर्थात एचडीपीएस आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सोलापूर महापालिका ॲक्शन मोडमध्ये! थकबाकीदारांच्या मालमत्ता सील, नळजोडण्यांवरही हातोडा






