Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्त्या केल्या रद्द; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांना सीईओ गुलाबराव खरात यांचा दणका

Buldhana Zilla Parishad Gulabrao Kharat: बुलढाणा जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी मोठी कारवाई केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 21, 2026 | 07:03 PM
Buldhana News: बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्त्या केल्या रद्द; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांना सीईओ गुलाबराव खरात यांचा दणका
Follow Us
Follow Us:
  • बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्त्या केल्या रद्द
  • सीईओ गुलाबराव खरात यांचा दणका
  • वेतन मूळ आस्थापनेवर रूजू झाल्यावरच
बुलढाणा: प्रतिनियुक्तीच्या गोंडस नावाखाली वर्षानुवर्षे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी ‘जोर का झटका धीरेसे’ दिला. प्रतिनियुक्ती रद्द झाल्याने मर्जी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका बसल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात वाढली. विविध विभागांमध्ये प्रतिनियुक्ती वा सेवाअधिग्रहित केलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती सीईओंनी मागितली होती. तसा प्रकरणनिहाय आढावादेखील घेतला. खाते विभागाच्या स्तरावर तात्पुरती व्यवस्था अथवा प्रतिनियुक्ती, सेवाअधिग्रहित या सबबीखाली बहुतांश कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रशासकीय कारणाखेरोज त्यांच्याच विनंतीवरून केल्याची वाब निदर्शनास आली.

कोळसा प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला? मुख्यमंत्र्यांकडून दखल; केंद्राकडे फेरविचाराचा प्रस्ताव सादर

परंतु, काही प्रकरणांमध्ये प्रशासकीय सोय लक्षात घेता तसेच कुशल कर्मचाऱ्यांची गरज या अपवादात्मक स्थितीतही सेवा अधिग्रहित केल्याचे समोर आले. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त राहात असल्याने शाळा बंद आंदोलने केली जातात. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. अल्पपटसंख्येच्या बहुशिक्षकी शाळांमधून शिक्षकाची तात्पुरती व्यवस्था करून रिक्त जागेवर शिक्षक नेमले जातात. ही व्यवस्था म्हणजे प्रतिनियुक्ती असल्याने त्याबाबत विभागीय आयुक्तांची मान्यता घेणे ग्राम विकास विभागाच्या ८ एप्रिल २०११ च्या शासन परिपत्रकानुसार बंधनकारक आहे. दरम्यान, प्रतिनियुक्ती रद्द केलेला आकडा समोर आला नाही.

वेतन मूळ आस्थापनेवर रूजू झाल्यावरच

खातेविभागांकडून तालुकाबाह्य व तालुक्यांतर्गत केलेल्या प्रतिनियुक्ती, सेवाअधिग्रहित आदेश रद्द करण्यात आले. सेवाअधिग्रहित तथा प्रतिनियुक्त कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या मूळ आस्थापनेवर रूजू झाल्याशिवाय काढले जाऊ नये, अशी सक्त ताकीदही देण्यात आली. जिल्हा परिषद, बुलढाण्याचे सीईओ गुलाबराव खरात म्हणाले की, ८८ मा है ती मागविल्यानंतर अनेक प्रतिनियुक्त्या आढळून आल्या. अशा कर्मचाऱ्यांनी काही वर्षे काम केल्यानंतर स्वतःहून प्रतिनियुक्ती सोडायला हव्यात. म्हणजे इतरही कर्मचारी प्रशिक्षित होऊन त्या जागेवर प्रामाणिक काम करू शकतील.

Buldhana News: मृद व जलसंधारण अधिकाऱ्यांची कार जप्त; पाझर तलाव भूसंपादनप्रकरणी कोर्टाची कारवाई

Web Title: Buldhana zp deputation cancelled gulabrao kharat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news
  • Teacher Jobs

संबंधित बातम्या

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे
1

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?
2

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले
3

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

MLA Shweta Mahale: महिला पदाधिकाऱ्यांना मेसेज करणाऱ्यांचे आयडी अन् नंबर थेट DIG कडे देणार; आमदार श्वेता महाले यांची माहिती
4

MLA Shweta Mahale: महिला पदाधिकाऱ्यांना मेसेज करणाऱ्यांचे आयडी अन् नंबर थेट DIG कडे देणार; आमदार श्वेता महाले यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.