Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट! खरीपने दिला फटका,आता रब्बीचा हंगामही अडचणीत; ९० हजार हेक्टरवरच पेरणी

Buldhana Rabi Sowing Season Water Shortage: बुलढाण्यात पाणीटंचाई आणि कमी ओलाव्यामुळे रब्बी पेरणी रखडली आहे.१८ नोव्हेंबरपर्यंत केवळ ९० हजार ६९० हेक्टरवर म्हणजेच २३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 19, 2026 | 07:14 PM
english keywords Buldhana Rabi Sowing

english keywords Buldhana Rabi Sowing

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात रब्बी पेरणीचा वेग मंदावला
  • २.९७ लाख हेक्टर क्षेत्र अद्याप पेरणीच्या प्रतीक्षेत
  • प्रत्यक्ष पेरणी केवळ २३ टक्के
बुलढाणा: अल निनोच्या संभाव्य प्रभावासह यंदा सरासरीच्या तुलनेत सुमारे ३० टक्के कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील शेतीचे आर्थिक गणित विस्कळीत झाले. खरीप हंगामाता अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रब्बी हंगामाचेही संकट उभे ठाकले. कृषी विभागाने यंदा ३ लाख ८८ हजार २४४ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन केले होते.

मात्र, अपुरा पाऊस, धरणांमधील मर्यादित जलसाठा आणि जमिनीतील कमी झालेला ओलावा यामुळे १८ नोव्हेंबरपर्यंत केवळ ९० हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. म्हणजेच नियोजित क्षेत्राच्या अवघ्या २३ टक्के क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली असून, तब्बल २ लाख ९७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र अद्याप पेरणीच्या प्रतीक्षेत आहे.

Buldhana: दुष्काळाच्या संकटात शासनाचा आधार; बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटींचे अनुदान वितरित; ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत

बुलढाणा जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान साधारणतः ७१० ते ८१०मिलिमीटरच्या दरम्यान असते. मात्र, यंदा सुमारे ५१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरीप हंगामापासूनच पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागला. अनेक भागांत पावसाचे वितरण असमान राहिल्याने पिकांची वाढ खुंटली, तर काही ठिकाणी उत्पादनात मोठी घट झाली. खरीप हंगामातील नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठीही पुरेसा ओलावा मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा तसेच विविध भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी असल्याने शेतकऱ्यांना पेरणीचे नियोजन बदलावे लागत आहे. सिंचनासाठी पाण्याची खात्री नसल्याने अनेकांनी पेरणी टाळली, तर काही शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या आणि कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य दिले आहे. याचा परिणाम गहू, हरभरा आणि ज्वारीच्या एकूण उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. कांदा आणि भाजीपाला लागवडीचे क्षेत्रही घटण्याची चिन्हे आहेत.

एकूणच, खरीप हंगामाने निराशा केल्यानंतर रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, पावसाची कमतरता आणि अपुऱ्या जलसाठ्यामुळे रब्बीचे पेरणी क्षेत्रच आक्रसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. आता उर्वरित हंगामात पाण्याची उपलब्धता किती राहते आणि पेरणी क्षेत्रात कितपत वाढ होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

उत्पादन घटल्यास बाजारपेठेत महागाईचे सावट जिल्ह्यात रब्बी पिकांचे क्षेत्र आणि उत्पादन घटल्यास त्याचे परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरते मर्यादित राहणार नाहीत. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्यास आगामी काळात बाजारपेठेतील आवक कमी होऊ शकते.

शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट

खरीप हंगामातील आर्थिक नुकसान, रब्बीच्या पेरणीसाठी लागणारा वाढीव खर्च, बियाणे आणि खतांचे दर तसेच सिंचनासाठी पाण्याची अनुपलब्धता यामुळे शेतकरी आर्थिक कोडीत सापडला आहे. विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीपातळी खालावत असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करणेही कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत पेरणी झालेल्या पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही, तर उभ्या पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती आहे.

बुलढाण्याचे जिल्हा कृषी अधीक्षक, संतोष डाबरे म्हणाले की, यंदा सरासरीपेक्षा कमी ७८ यदा सरासरीपेक्षा कमी जमिनीतील ओलाव्याची कमतरता यासोबतच कमी पाणीसाठा आणि सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, तलाव, सिंचन विहिरी, बोरवेलची खालावलेली भूजल पातळी यामुळे यंदा रब्बीचे पेरणी क्षेत्र घटले.

Buldhana Accident: मलकापूर-बुलढाणा मार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरखाली दबून दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, पोलिसांत गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुलढाणा जिल्ह्यात यंदा रब्बी पेरणीचे किती क्षेत्र नियोजित आहे?

    Ans: कृषी विभागाने ३ लाख ८८ हजार २४४ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे.

  • Que: १८ नोव्हेंबरपर्यंत किती क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली?

    Ans: जिल्ह्यात ९० हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

  • Que: बुलढाण्यात रब्बी पेरणीची टक्केवारी किती आहे?

    Ans: नियोजित क्षेत्रापैकी केवळ २३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Web Title: Buldhana rabi sowing 23 percent water shortage farmers crisis pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • buldhana news
  • Crisis on farmers
  • Rabi season

संबंधित बातम्या

Buldhana: दुष्काळाच्या संकटात शासनाचा आधार; बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटींचे अनुदान वितरित;  ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत
1

Buldhana: दुष्काळाच्या संकटात शासनाचा आधार; बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटींचे अनुदान वितरित; ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन
2

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन

Washim News: कर्ज काढून हळद लावली, पण पाण्याअभावी पीक उद्ध्वस्त! कंझरात २०० पैकी १०० एकर हळद वाळली; शेतकरी हवालदिल
3

Washim News: कर्ज काढून हळद लावली, पण पाण्याअभावी पीक उद्ध्वस्त! कंझरात २०० पैकी १०० एकर हळद वाळली; शेतकरी हवालदिल

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! कंटेनरची एकापाठोपाठ  १६ कारला धडक; अनेक जखमी
4

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! कंटेनरची एकापाठोपाठ १६ कारला धडक; अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.