Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाणा शहरात काँग्रेसकडून भव्य आसूड मोर्चा, वाढती महागाई, इंधन टंचाई, नीटपेपरफुटी वरून काँग्रेसचे जोरदार आंदोलन

वाढती महागाई, इंधन टंचाई, शेतीमालाला मिळणारे कमी भाव, नीट पेपरफुटी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत काँग्रेसकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. अश्यातच आज (सोमवार, १ जून) सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सरकारच्या भूमिकेमुळे बुलढाणा शहरात भव्य आसूड मोर्चाचे आयोजन काँग्रेसकडून करण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Jun 01, 2026 | 08:48 PM
Congress Protest in Buldhana, Central Government, Congress Protest, Maharashtra Government,

Congress Protest in Buldhana, Central Government, Congress Protest, Maharashtra Government,

Follow Us
Follow Us:

देशभरात गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाई आणि दरवाढ, नीट पेपरफुटी, वाढती महागाई यासारख्या प्रश्नांवरून वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार याबाबत विविध उपाययोजना राबवत असल्याचे दिसत असले तरीही समाधानकारक उपाययोजना होत नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. यासाठीच विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. राज्यातदेखील या प्रश्नांवरून महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाढती महागाई, इंधन टंचाई, शेतीमालाला मिळणारे कमी भाव, नीट पेपरफुटी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत काँग्रेसकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. अश्यातच आज (सोमवार, १ जून) सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सरकारच्या भूमिकेमुळे बुलढाणा शहरात भव्य आसूड मोर्चाचे आयोजन काँग्रेसकडून करण्यात आले.

वाढती महागाई, इंधन टंचाई, शेतीमालाला मिळणारे कमी भाव, नीट पेपरफुटी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सरकारच्या भूमिकेविरोधात आज बुलढाणा येथे भव्य आसूड मोर्चा काढण्यात आला. गर्दे हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघालेला हा मोर्चा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. सरकारविरोधी घोषणांनी संपूर्ण बुलढाणा शहर दणाणून गेले. “आसूड मोर्च्यात उपस्थित हजारो शेतकरी, युवक, महिला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लढाऊ वृत्तीने या संघर्षाला नवी ऊर्जा दिली. जनतेच्या हक्कांसाठीचा हा आवाज अधिक बुलंद होत राहील आणि अन्यायाविरोधातील हा लढा अधिक तीव्रतेने सुरू राहील,” असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केले आहे.

यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार धीरज लिंगाडे, माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार पाटील, माजी आमदार राजेश एकडे यांसह काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साताऱ्यात महाविकास आघाडीकडून बैलगाडी आंदोलन

वाढती महागाई, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न, पेपरफुटीच्या घटना तसेच महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लाडकी बहीण योजनेतून तब्बल १.२५ कोटीहून अधिक महिलांना अपात्र, सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा

या आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैलगाडीतून केलेली प्रतीकात्मक एंट्री. इंधनाच्या वाढत्या किंमतींविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी हा अनोखा आंदोलनात्मक प्रयोग करण्यात आला. “सामान्य जनतेचे जगणे महागाईमुळे कठीण झाले आहे,” असा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

महायुती आणि महाविकास आघाडीत होणार तुल्यबळ लढत, कोणत्या जागेवर महायुतीचा कोण उमेदवार लढणार? जाणून घ्या…

Web Title: Congress protest in buldhana against central and state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Govenment
  • Mumbai Congress protests

संबंधित बातम्या

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!
1

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!

Rahul Gandhi: राजधानी तापली! पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात
2

Rahul Gandhi: राजधानी तापली! पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
3

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलन म्हणजे राजकीय कटकारस्थान, काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा वापर; शिंदे नेत्यांचा घणाघाती आरोप
4

CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलन म्हणजे राजकीय कटकारस्थान, काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा वापर; शिंदे नेत्यांचा घणाघाती आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.