Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

Prataprao Jadhav on Farmers Financial Aid: महाराष्ट्रातील ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष मदत किंवा बोनस देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 30, 2026 | 06:31 PM
Prataprao Jadhav

Prataprao Jadhav

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी
  • सोयाबीन-कापूस उत्पादकांना बोनस द्या
  • केंद्राकडे जाधवांची मागणी
बुलढाणा: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन कापसाच्या आणि शासकीय खरेदीतून मिळणाऱ्या संभाव्य अतिरिक्त उत्पन्नाचा उपयोग करावा. या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विशेष आर्थिक सहाय्य किवा बोनस देण्याचा विचार करावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली.

Buldhana: उपकार केल्यासारखी भाषा करू नका! नवनाथ बन यांना तुपकरांचे प्रतिउत्तर; शेतकऱ्याच्या बांधावर अधिवेशन घेण्याची मागणी

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कमी पर्जन्यमान, घटलेले पीक उत्पादन, वाढता कृषी खर्च आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. राज्य ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्याचा उल्लेख करत, या भागांतील शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे प्रतापराव जाधव यांनी मांडले. गेल्या वर्षी नाफेडमार्फत सोयाबीनची शासकीय खरेदी प्रतिक्विंटल ५ हजार ७०८ रुपये या किमान आधारभूत किमतीने (एमएसपी) करण्यात आली होती.

सध्या सोयाबीनचा बाजारभाव प्रतिक्विंटल सुमारे ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे शासकीय संस्थांकडे उपलब्ध असलेल्या सोयाबीनच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) कापसाची खरेदी प्रतिक्विंटल ८ हजार २६७ रुपये या किमान आधारभूत किमतीने करण्यात आली होती. सध्याचा कापसाचा बाजारभाव प्रतिक्विंटल सुमारे ९ हजार ते ९ हजार ५०० रुपये असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या बाजारभावातील फरकामुळे शासकीय खरेदीतील सोयाबीन व कापसाच्या विक्रीतून संभाव्य अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. दुष्काळामुळे उत्पादनात घट आणि शेतीच्या खर्चात वाढ झालेल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून आर्थिक दिलासा मिळू शकतो. त्यामुळे शासकीय खरेदीतून मिळणाऱ्या संभाव्य अतिरिक्त उत्पन्नाचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी केली आहे.

सरकारने सकारात्मक विचार करावा

या पाश्र्वभूमीवर, शासकीय संस्थांना मिळू शकणारे अतिरिक्त उत्पन्न आणि दुष्काळग्रस्त शेतक-यांची आर्थिक परिस्थिती यांचा विचार करून संबंधित तालुक्यातील सोयाबीन व कापूस उत्पादकांना विशेष आर्थिक सहाय्य किंवा बोनस देण्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी विनती प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली.

Washim: दुष्काळाने रब्बीच्या पेरणीसमोर दुहेरी संकट, आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले; सरकारच्या मदतीकडे लक्ष

Web Title: Maharashtra drought farmers financial aid soybean cotton bonus prataprao jadhav pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • buldhana news
  • Crisis on farmers
  • Prataprao Jadhav

संबंधित बातम्या

Buldhana: उपकार केल्यासारखी भाषा करू नका! नवनाथ बन यांना तुपकरांचे प्रतिउत्तर; शेतकऱ्याच्या बांधावर अधिवेशन घेण्याची मागणी
1

Buldhana: उपकार केल्यासारखी भाषा करू नका! नवनाथ बन यांना तुपकरांचे प्रतिउत्तर; शेतकऱ्याच्या बांधावर अधिवेशन घेण्याची मागणी

Buldhana: शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा, पीक माफीनंतरही खाती सुरू; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
2

Buldhana: शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा, पीक माफीनंतरही खाती सुरू; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Washim: दुष्काळाने रब्बीच्या पेरणीसमोर दुहेरी संकट, आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले; सरकारच्या मदतीकडे लक्ष
3

Washim: दुष्काळाने रब्बीच्या पेरणीसमोर दुहेरी संकट, आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले; सरकारच्या मदतीकडे लक्ष

Farmers Water Crisis : वैजापुरात पाण्यासाठी शेतकरी आक्रमक! नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
4

Farmers Water Crisis : वैजापुरात पाण्यासाठी शेतकरी आक्रमक! नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.