
Ravikant Tupkar on Navnath Ban
सावधान! दोनदा चूक केली तर दंड, तिसऱ्यांदा थेट…; Pune शहरात पाणी वापराबाबत कठोर नियम
त्याआधी नवनाथ बन यांनी शेतकरी नेते तुपकर यांच्या सरकारवरील टीकेला प्रत्युत्तर देत आमच्या सरकारने शेतकऱ्यांना सार्वधिक मदत दिल्याचा दावा करीत तूपकरांना सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. तूपकर म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता कर भरते आणि त्याच पैशातून सरकार शेतकऱ्यांना मदत करते. त्यामुळे मदतीचे निर्णय घेताना सरकारने शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा आव आणू नये.
एकीकडे दुष्काळाने नैसर्गिक संकटांनी शेतकरी उध्वस्त होत असताना दुसरीकडे सरकारकडे इतर खर्चासाठी कोट्यावधी रुपये उपलब्ध असतात. मग शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची वेळ आली की पैशांचा प्रश्न का उपस्थित, असा सवाल त्यांनी केला.
सरकारच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतांना तुपकरांनी व्हीआयपी साठी गाड्या खरेदी करण्याच्या मुद्दयावरून ही सरकारला धारेवर धरले, व्हीआयपीच्या गाड्यांसाठी साडेबारा कोटी रुपये खर्च करण्याची तयारी असते, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देताना अडचणी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला
तू कर आणि हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनावरूनही आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकरी संकटात असताना नागपुर किंवा मुंबईत सरकारी खर्चाने अधिवेशन घेण्याऐवजी थेट शेताच्या बांधावर अधिवेशन घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.