बुलढाणा : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी १० दिवसांपासून राजू शेट्टी (MP Raju Shetty) यांनी कोल्हापुर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाची ठिणगी पेटवली आहे. याच ठिणगीची धग आज पेठ या गावात जाणवली आहे. ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आक्रमक झाल्याने त्यांच्या समर्थनार्थ शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. नागपूर – सोलापूर महामार्ग चिखली जवळ पेठ फाट्यावर रस्ता रोखून धरल्याने पोलिसांनी रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना स्थानबद्ध (Located) केले आहे.
[read_also content=”सुराबर्डीच्या जंगलात भुकेने व्याकुळलेल्या जखमी बिबट्याचा मृत्यू, आपसी झुंजीत झाला होता जखमी https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/injured-leopard-dies-of-starvation-in-surabardi-forest-nraa-249045.html”]
शेतीला दिवसा सलग दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी गेल्या १० दिवसापासून राजू शेट्टी (MP Raju Shetty) यांच कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलन सुरू आहे. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन राजू शेट्टी (MP Raju Shetty) यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ऊर्जा मंत्री नितीन राऊत तसेच ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनवरून चर्चा देखील केली. यावेळी महावितरणकडून तीन टप्प्यात दिल्या जाणाऱ्या विजेपैकी रात्रीच्या टप्प्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्या संदर्भातली आग्रही मागणी राजू शेट्टी (MP Raju Shetty) यांनी लावून धरली. मात्र अधिकाऱ्यांनी याला तांत्रिक कारण देत असमर्थता दर्शवली. त्यामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि राजू शेट्टी यांच्यामधील शिष्टाईसाठीची चर्चा फिस्कटली.
[read_also content=”काँग्रेसच्या नेत्यावर कसा झाला जीवघेणा हल्ला ! नेमके काय घडले वाचा सविस्तर वृत्त ? https://www.navarashtra.com/chandrapur/vidarbha/chandrapur/how-fatal-attack-on-congress-leader-read-the-detailed-news-of-what-exactly-happened-nraa-249026.html”]
दरम्यान खासदार राजू शेट्टी (MP Raju Shetty) यांच्या समर्थनार्थ विदर्भाची बुलंद तोफ रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी शेतकऱ्यांसह नागपूर – सोलापूर महामार्ग अडवून धरला. जोपर्यंत राजू शेट्टीच्या (MP Raju Shetty) आंदोलनावर मार्ग निघत नाही, तो पर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका तूपकरांनी घेतल्याने नागपूर – सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दिवसा वीज द्या, शेतीसाठी रात्री वीजपुरवठा केला जातो. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी पुरवठा करताना शेतकऱ्यांना सर्पदंश होतो. यातून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे. रात्रीच्या वेळी अपघात होण्याचा संभव वाढता आहे. या बाबी विचारात घेऊन शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्यावी, यासह इतरही मागण्या करण्यात आल्या. आंदोलना दरम्यान आज बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने त्यांच्या मार्गात अडथळा होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आंदोलकांकडून मुभा देण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना आंदोलन स्थळावरून स्थानबद्ध (Located) केले आहे.