Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: ‘रीलस्टार’ तहसीलदारांची पथकाकडून झाडाझडती, रील प्रकरणासह संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची चौकशी; अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष

Risod Tahsildar Pratiksha Tejankar Reel Case: वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयातील ‘सिनेमॅटिक रील’ प्रकरणानंतर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 03, 2026 | 08:47 PM
Risod Tahsildar Pratiksha Tejankar

Risod Tahsildar Pratiksha Tejankar

Follow Us
Follow Us:
  • ‘सिनेमॅटिक रील’ भोवली?
  • तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या कामकाजाची चौकशी
  • विविध प्रशासकीय बाबी तपासणार
वाशिम: रिसोड तहसील कार्यालयातील ‘सिनेमॅटिक रील’ प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत चौकशी सुरू झाली. अमरावतीच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या निर्देशानुसार गठित करण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीने गुरुवारी रिसोड तहसील कार्यालयात दाखल होत विविध बाबींची तपासणी केली. शासनाने यापूर्वीच त्यांच्या रिसोड तहसीलदार पदावरील संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत, या समितीचे अध्याक्ष बुलढाण्याचे अपर जिल्हाधिकारी सुधीर खांडे असून, अमरावतीचे सहाय्यक आयुक्त संतोष कणसे हे समितीचे सदस्य आहेत. समितीने तहसील कार्यालयातील संबंधित कागदपत्रे, कामकाज आणि रील प्रकरणाशी संबंधित बाबींची माहिती घेतली, तसेच तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्याकडेही चौकशी करण्यात आल्याची माहिती समितीतील अधिकाऱ्यांनी दिली.

Buldhana: आरटीओंनी जप्तीतील ३७ वाहने केली परत, ३५ वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू; ३ लाख रुपयांचा दंड वसूल

संपूर्ण कामकाजाची होणार तपासणी

सुरुवातीला केवळ रील प्रकरणापुरती चौकशी मर्यादित राहणार असल्याचे चित्र असताना आता त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची तपासणी केली जात आहे. शासनाच्या आदेशानुसार ही चौकशी रील प्रकरणासह तहसीलदार म्हणून त्यांच्या कार्यकाळातील प्रशासकीय कामकाजाशी संबंधित विविध बाबींवर केंद्रित आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान, त्यांच्या कार्यकाळातील काही महसूलविषयक कामकाज आणि अवैध उत्खननासंदर्भात विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, या बाबींमध्ये गैरप्रकार झाल्याचे अद्याप चौकशीत सिद्ध झालेले नसल्याने त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. तहसील कार्यालयात शासकीय खुर्चीवर बसून आणि कार्यालयीन कामकाजाच्या पार्श्वभूमीवर रोल तयार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाची राज्य शासनाने दखल घेतली होती. त्यानंतर त्यांच्या प्रशासकीय कामकाजाची विशेष चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

पुढील आठवड्‌यात अहवाल ?

विशेष चौकशी समिती आपला अहवाल विभागीय आयुक्त नयना गुंठे यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे चौकशीदरम्यान नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात आणि अहवालात कोणते निष्कर्ष नोंदवले जातात, याकडे वाशिम जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अपर जिल्हाधिकारी, सुधीर खांडे म्हणाले की, सध्या चौकशी सुरू आहे, सागणे शक्य नाही चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल, त्यानंतर वरिष्ठांकडून याबाबत माहिती दिली जाईल.

सहाय्यक आयुक्त अमरावती, संतोष कणसे म्हणाले की, आम्ही चोकशी करत आहोत. चौकशीतून नेमके काय समीर येते, हे अहवाल सादर केल्यानंतर स्पष्ट होईल. अहवाल वरिष्टांकडे सोपविला जाईल.

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक

Web Title: Risod tahsildar pratiksha tejankar reel case inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • Instareel
  • Risod Taluka
  • tehsil office
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: वाहन कायद्याची अंमलबजावणी करा, आरटीओ रवींद्र भुयार यांच्या सूचना; कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा
1

Washim: वाहन कायद्याची अंमलबजावणी करा, आरटीओ रवींद्र भुयार यांच्या सूचना; कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
2

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Washim News: पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा; संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश
3

Washim News: पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा; संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश
4

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.