Washim drought-like situation:
झालेल्या भागात नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णयानुसार विविध उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये जमीन महसूल वसुलीस सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती तसेच कृषिपंपाच्या वीजबिलात सवलत यांचा समावेश आहे, जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत.
शासन निर्णयानुसार बाधित भागातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्हा वाशिम,पालकमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले की, संकटकाळात शेतक-यांना पूर्ण पाठबळ देणे हे आमचे प्राधान्य आहे. शासन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील तालुक्यांचा दुष्काळसदृश यादीत समावेश झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती व मदत वेळेत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.






