
Washim Crop Survey Dattatray Bharne
पाटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. दादासाहेब सुभेदार मगर यांना पीएच.डी. पदवी प्रदान
पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे, यामध्ये पिकांची सद्यस्थिती, पेरणीची वेळ, शेवटचा झालेला पाऊस, पावसातील खंड, जमिनीतील ओलावा तसेच पिकांना उपलब्ध असलेले पाणी याची माहिती घेण्यात येईल. यासोबतच गावांमधील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चारा व पाण्याची स्थिती याचाही आढावा घेण्यात येणार आहे. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी – प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी व परिस्थितीची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उपाययोजनांची गरज सर्व तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी दुष्काळसदृश्य परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्यासह तालुक्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. कमी पाऊस आणि पावसातील
खंडामुळे ज्या भागांतील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, अशा गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, पाहणीअंती प्राप्त अहवालांच्या आधारे शासनाच्या निकषांनुसार आवश्यक ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात आणि शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री भरणे यांनी दिले.
पावसाने दगा दिला, धाराशिवच्या खरीपावर संकट! जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने शेतकऱ्यांची चिंता वाढली