
SR Convent school student selection
IND Vs AFG: मोठी खळबळ! अफगणिस्तान दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर?
या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव, एकाग्रता, शिस्त, आत्मविश्वास आणि कौशल्याच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली. बुद्धिबळ मध्ये विद्यार्थ्यांनी डावपेच, संयम व निर्णयक्षमता दाखवून आपली गुणवत्ता सिद्ध केली, तर योगासन स्पर्धेत संतुलन, लवचिकता, अचूकता आणि आत्मविश्वास याचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित सराव आणि पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक उद्धव राऊत शाळेच्या मुख्याध्यापिका शितल राऊत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ही निवड विद्यार्थ्यांसाठी तसेच शाळेसाठी अभिमानाची बाब असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही ते यशाची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बुद्धिबळ आणि योगासनासारख्या खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक एकाग्रता, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. त्यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.