
Washim School Teacher Abuse Student
Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट
दिलीप बोरकर (५६) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. वाशिम तालुक्यातील तालुक्यातील काटा जि. प. शाळेत १४ मुलींशी दुष्कृत्य केल्याचा त्याचावर आरोप आहे. विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन करीत असल्याची माहिती शाळेतील एका शिक्षिकेला मिळाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले, वाशिम ग्रामीण पोलीसांनी त्याला जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आता पोलीस कोठडीत या घटनेचा उलगडा होणार आहे. या प्रकरणाचा तपास ग्रामीणच्या ठाणेदार पाटील करीत आहे.
बातमीत शुक्रवारी प्रकाशित झालेले छायाचित्र पोलीस स्टेशन वाशिम ग्रामिण ‘मुलींसोबत दुष्कृत्य, शिक्षकाला अटक’ या अनावधानाने चुकीचे प्रसिद्ध झाले. सदर छायाचित्र हे आरोपी शिक्षकाचे नसून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले शिक्षक विजय भड यांचे आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलतर्फे पुरस्कार जाहीर झाला. शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षांपासून ते उललेखनीय कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र अनावधानाने त्यांचे छायाचित्र दुसऱ्या बातमीत प्रसिद्ध झाल्याने त्यांना मनःस्ताप सहन करावा लागला.