
Photo- Ai generated
या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालय व जिल्हा आरोग्य यंत्रणा तसेच धर्मदाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज डॉक्टरांचा सहभाग आहे. गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये किंवा परिसरात आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, नागरिकांना विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. गणेश मंडळांशी संपर्क साधून आरोग्य शिबिरांचे आयोजन गणेशोत्सवासारख्या मोठ्या लोकसहभागाच्या उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्य तपासणीची सुविधा पोहोचत असून, अधिकाधिक नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिम मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्यावतीने करण्यात आले.