
संतापजनक ! वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच झाली महिलेची प्रसूती; ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर
बुलढाणा : मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अवघ्या 50 मीटर अंतरावर महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. रुग्णालयातील परिचारिकेला विनंती करूनही कुणीही आरोग्य कर्मचारी मदतीला आले नाही. शेवटी खाजगी रुग्णालयातील महिला डॉक्टरांना आणून संबंधित बाळंत झालेल्या महिलेला अन्यत्र उपचारासाठी न्यावे लागले. या संतापजनक घटनेमुळे मेहकर ग्रामीण रुग्णालय प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला.
सदर घटना मंगळवारी सकाळी मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर घडली. अवघडलेल्या स्थितीत असलेली महिला रस्त्यावरच प्रसूत झाली. वेदनेने जोरजोरात ती ओरडत होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. जवळच राहणारे सामाजिक कार्यकर्ते योगेश सौभागे हे धावत ग्रामीण रुग्णालयात गेले. उपस्थित परिचारिका जाधव यांना सदर बाळंत झालेल्या महिलेच्या मदतीला येण्यास विनंती केली. मात्र, ‘मी रुग्णालयाच्या बाहेर अजिबात येणार नाही’, अशी असंवेदनशील भूमिका त्या परिचारिकेने घेतल्यामुळे सौभागे यांनी डॉ. आव्हाळे यांच्या खाजगी रुग्णालयात जाऊन तेथील महिला डॉक्टरला आणून बाळंत झालेल्या महिलेच्या उपचाराची व्यवस्था केली.
Vasai News : खड्ड्यांविरोधातील उपोषणाचा आठवा दिवस; विवेक यांची प्रकृती ढासळली, आंदोलन स्थगित
दरम्यान, माजी आमदार संजय रायमुलकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्याशी संपर्क साधून सदर संतापजनक घटनेची माहिती दिली व सीसीटीव्ही फुटेजही पाठविले. शासनाचा लाखो रुपये पगार घेऊनही संबंधित रुग्णालयातील डॉक्टर्स रुग्णालयात उपस्थित राहत नाहीत. रुग्णांना मोठ्या प्रमाणावर बाहेर रेफर करण्याचे प्रमाण वाढलेले आहे, असे म्हणत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी रायमुलकर यांनी केली.
रुग्णांना वेळेत उपचार मिळतील
याबाबत कडक कारवाई केली जाईल. तसेच रुग्णांना नियमित, उत्तम, व्यवस्थित आरोग्यसेवा मिळेल. याबाबत तातडीने उपाययोजना करणार असल्याची सारवासारव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार यांनी केली.
महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका?
ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये आढळून येणाऱ्या आजारांपैकी एक सामान्य रोग आहे. हे आजार तेव्हा होतो जेव्हा स्तनातील काही सेल्स असामान्यरित्या वाढू लागतात आणि हळूहळू गाठ किंवा ट्यूमरची समस्या तयार करतात. या आजाराचा धोका इतर देशांप्रमाणेच भारतातही झपाट्याने वाढू लागला आहे. वय, लठ्ठपणा, स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास, BRCA1 किंवा BRCA2 यांमुळे बेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो.