Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक; तब्बल 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला अटक केली. त्याने 25 डिसेंबर रोजी मोई येथे 30 लाखांची घरफोडी केली होती. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत मोटारसायकलच्या चाकावरून आरोपीला अटक केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 04, 2024 | 12:52 PM
घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक; तब्बल 29 लाखांचा मुद्देमाल जप्त
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला अटक केली. त्याने 25 डिसेंबर रोजी मोई येथे 30 लाखांची घरफोडी केली होती. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत मोटारसायकलच्या चाकावरून आरोपीला अटक केली. आमीर शब्बीर शेख (25, रा. निगडी प्राधिकरण. मूळ रा. वडेश्वर काटे, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते रात्री पावणे दहा वाजताच्या कालावधीत मोई येथे घरफोडी झाली. याबाबत नितीन शहाजी कर्पे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्याने कर्पे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूचे ग्रील कापून आत प्रवेश करत घरातून 47.8 तोळे सोने आणि पाच लाख 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 30 लाख 48 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक दुचाकी संशयितपणे जाताना दिसली. त्या दुचाकीचे चाक लाल रंगाचे होते. त्यानंतर मोई, निघोजे, कुरुळी परिसरात गस्त घालताना पोलिसांना संशयित दुचाकी दिसली. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो दुचाकीसह पळून जाऊ लागला.

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने कर्पे यांच्या घरी चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आमीर शेख याच्याकडून 47.8 तोळे सोन्याचे दागिने, तीन लाख रुपये रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण 29 लाख तीन हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीसउपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस अंमलदार राहू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, राजेंद्र खेडकर, संतोषवायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे यांनी केली.

Web Title: Burglar arrested as much as 29 lakhs worth of goods seized nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2024 | 12:52 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Pimpri Crime

संबंधित बातम्या

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! आता ३ हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई
1

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! आता ३ हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Ladki Bahin Yojana की लाडका भाऊ योजना? 12431 पुरुषांची योजनेत घुसखोरी, सरकारी नोकरी असलेल्या पुरूषांचा समावेश
2

Ladki Bahin Yojana की लाडका भाऊ योजना? 12431 पुरुषांची योजनेत घुसखोरी, सरकारी नोकरी असलेल्या पुरूषांचा समावेश

रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू; शेवटचा फेरा मारतानाच अपघात…
3

रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू; शेवटचा फेरा मारतानाच अपघात…

चकना सेंटर चालवणाऱ्या तरुणावर चाकूने वार, दगडानेही मारहाण; नेमकं काय घडलं?
4

चकना सेंटर चालवणाऱ्या तरुणावर चाकूने वार, दगडानेही मारहाण; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.