Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! आता ३ हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता ३ हेक्टरच्या वाढीव मर्यादेनुसार मदत करण्याचा शासन निर्णय (GR) नुकताच जारी केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 21, 2025 | 01:55 PM
राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! आता ३ हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! आता ३ हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्याच्या विविध भागांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला. या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या उभी पिके आडवी झाली, अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या, ज्यामुळे जगाच्या पोशिंद्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी मान्यता दिली असून आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

वाल्मिक कराडची काय लायकी होती? तूच त्यांना…; करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपर्यंत मदत व पुनर्वसन विभागाकडून यंदाच्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे ८१३९ कोटी रुपये इतक्या रकमेचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री जाधव पाटील यांनी यावेळी दिली.

मंत्री पाटील म्हणाले, राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सहा लाख ५६ हजार ३१०.८३ हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख १२ हजार १७७ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यापूर्वी या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती, तर आता अतिरिक्त एक हेक्टरसाठी ही वाढीव मदत देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा आधार दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी व्यक्त केला छत्रपती संभाजीनगर विभाग- बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील तीन लाख ५८ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या तीन लाख ८८ हजार १०१.१३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ३४६ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये.

नागपूर विभाग- नागपूर, चंद्रपूर , वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार ९३१ शेतकऱ्यांच्या सात हजार ६९८.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी सात कोटी ५१ लाख ७५ हजार रुपये.

नाशिक विभाग – नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ५३ हजार ८६५ शेतकऱ्यांच्या ५० हजार ६२९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ५९ कोटी ३६ लाख १३ हजार रुपये.

अमरावती विभाग – अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख ७ हजार ६१५ शेतकऱ्यांच्या एक लाख ३९ हजार ४३८.२३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी १३१ कोटी ५६ लाख ४७ हजार रुपये.

पुणे विभाग – सोलापूर व सांगली जिल्ह्यातील ८८ हजार १४३ शेतकऱ्यांच्या ७० हजार ४१८.८९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी १०३ कोटी ३७ लाख २० हजार रुपये.

कोकण विभाग – ठाणे व पालघर जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांच्या २५.३३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी दोन लाख १६ हजार रुपये.

Thane News: अडीच वर्षांची ‘वियाना’ घरातून बेपत्ता! दिवाळीच्या तोंडावर कुटुंब हादरले; पोलीस धावले अन्…

Web Title: Government decision issued regarding increased limit of 3 hectares for affected farmers approval for distribution of funds worth rs 648 crore 15 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Monsoon

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप! प्रताप सरनाईक यांच्याकडून १०१ गोधनांची दिवाळी भेट!
1

Pratap Sarnaik : शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप! प्रताप सरनाईक यांच्याकडून १०१ गोधनांची दिवाळी भेट!

Onion Rate : कांदा लागवडीवर ६०,००० रुपये खर्च, हाती दमडीही नाही; शेतकऱ्याला अश्रू अनावर
2

Onion Rate : कांदा लागवडीवर ६०,००० रुपये खर्च, हाती दमडीही नाही; शेतकऱ्याला अश्रू अनावर

Ladki Bahin Yojana की लाडका भाऊ योजना? 12431 पुरुषांची योजनेत घुसखोरी, सरकारी नोकरी असलेल्या पुरूषांचा समावेश
3

Ladki Bahin Yojana की लाडका भाऊ योजना? 12431 पुरुषांची योजनेत घुसखोरी, सरकारी नोकरी असलेल्या पुरूषांचा समावेश

रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू; शेवटचा फेरा मारतानाच अपघात…
4

रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू; शेवटचा फेरा मारतानाच अपघात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.