• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Cabinet Expansion Formula Ready What Will Shinde Pawar Get Nras

Cabinet expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला तयार; पण शिंदे-पवारांचं टेन्शन वाढवणार

सध्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 132 आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे चार अपक्ष आमदारही भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 07, 2024 | 01:02 PM
Cabinet expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला तयार; पण शिंदे-पवारांचं टेन्शन वाढवणार

Photo Credit- Social Media मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला तयार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून आजपासून विधीमंडळाचे विशेष अधिवेशनही सुरू झाले आहे.  यानंतर आता महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उत्सुकता वाढू लागली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे नेत्यांचे लक्ष लागले आहे.  विशेष म्हणजे मंत्रिपदाची इच्छा बाळगणारे नेते मंडमंडळी मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच विशेष अधिवेशनानंतर राज्यात 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे  हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता दिसत नाही. म्हणजेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकार घाई करण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र, महाआघाडीत मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

शपथ घेऊनही महायुतीत चढाओढ सुरूच

निवडणुकीच्या निकालानंतरही  महाराष्ट्राच्या राजकारणात  नाट्यमय घडामोडी सुरूच होत्या. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात गृहमंत्रिपद मिळावे अशी मागणी  एकनाथ शिंदे यांनी केल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. पण भाजपकडून गृहखाते देण्यास ठाम नकार आल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले आणि थेट त्यांच्या साताऱ्यातील गावी निघून गेले. जवळपास दहा-बारा दिवसांच्या नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा सक्रीय झाले. 5 तारखेला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तर  एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

Mahayuti Cabinet expansion: महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; कुणाला मिळणार संधी, कुणाची होणार गच्छंती?

मात्र, उपमुख्यमंत्री होणे शिंदे यांना सहजासहजी मान्य नव्हते. त्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांसह भाजपचे प्रमुख नेते गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनाही मेहनत घ्यावी लागली. मात्र फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतरही महायुतीची कोंडी संपलेली नाही. मंत्रिपदावरून आता महायुतीमध्ये रस्सीखेच अद्यापही सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे.

7 आमदारांसाठी एक मंत्रिपदाचा फॉर्म्युला

तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. जुन्या नेत्यांबरोबरच मंत्री होण्याची क्षमता असलेले अनेक प्रतिभावान तरुण आमदारही आहेत. पण घटनेत दिलेल्या तरतुदींनुसार कोणत्याही राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या केवळ 15 टक्के सदस्यांनाच मंत्री करता येते.

बॅलेट पेपरवर मतदान घ्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या इशारा

नियमानुसार 288 विधानसभा जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत सरासरी 6 ते 7 आमदारांच्या एका मंत्र्याच्या सूत्रानुसार जास्तीत जास्त 43 मंत्री करता येतात. आमदारांच्या संख्येच्या आधारे भाजपला सर्वाधिक 22 मंत्रीपदे, शिंदे यांच्या शिवसेनेला 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.

फडणवीस सरकारसमोर आव्हान

सध्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 132 आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे चार अपक्ष आमदारही भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामध्ये असे अनेक आमदार आहेत जे तीन किंवा त्याहून अधिक वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले असले तरी मंत्री होण्याची वाट पाहत आहेत. एकनाथ शिंदे यांनी 2022  मध्ये बंडखोरी करताना शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या अनेक आमदारांना मंत्री करण्याचे आश्वासन दिले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. अजित पवार यांनीही राष्ट्रवादीत बंडखोरी करताना पाठिंबा दिलेल्या आमदारांना असेच वचन दिले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मागील महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी न मिळालेले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार यावेळी आशावादी आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तारात येणाऱ्या आव्हानांवर फडणवीस कसा मार्ग काढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Cabinet expansion formula ready what will shinde pawar get nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 01:02 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
4

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५’ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर

‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५’ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

काय आहे Ghost Resign? Gen Z चा धक्कादायक ऑफिशियल ट्रेंड, तुम्ही Boss असाल तर जाणून घ्याच!

काय आहे Ghost Resign? Gen Z चा धक्कादायक ऑफिशियल ट्रेंड, तुम्ही Boss असाल तर जाणून घ्याच!

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.