मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात असलेले फोन टॅपिंग (Phone Tapping Case) व गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणीचे गुन्हे रद्द करण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात फोन टॅपिंग प्रकरणाची चांगलीच चर्चा होती. हे प्रकरण नुकतेच बंद करण्यात आले होते. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला. त्यामुळे हे प्रकरण तेव्हाच बंद झाले होते. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला. 2019 साली महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू असताना महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने नुकताच क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने हा रिपोर्ट स्वीकारला होता.
दरम्यान, आता रश्मी शुक्ला यांच्याविरोधात असलेले फोन टॅपिंग व गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणीचे गुन्हे रद्द करण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे.