
Maharashtra Census 2027, Digital Census India 2026,
Census 2027 Maharashtra: २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या काळात पार पडेल. तर स्व-गणना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत केली जाईल. हा देशव्यापी जनगणना कार्यक्रम १६ एप्रिल २०२६ रोजी सुरू होईल आणि ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. ही जनगणना प्रथमच डिजिटल पद्धतीने केली जात आहे. प्रथमच स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्व-गणना ही एक सुरक्षित वेब-आधारित सुविधा आहे, ज्याद्वारे प्रतिसादक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यापूर्वी १६ भाषांमध्ये आपली माहिती ऑनलाइन भरू शकतात.
या जनगणनेत माहितीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. २०२७ ची जनगणना देशभरातील ३० लाखांहून अधिक गणक, पर्यवेक्षक आणि इतर अधिकाऱ्यांमार्फत घेतली जाईल. गणक त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून एका मोबाईल ॲपद्वारे थेट माहिती गोळा करतील आणि सादर करतील.
घराचा क्रमांक काय आहे?
कुटुंबप्रमुखाचा मोबाईल क्रमांक
कुटुंब क्रमांक
कुटुंबप्रमुखाचे लिंग काय आहे?
जात कोणती आहे: सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय (OBC)?
कुटुंबात किती सदस्य आहेत?
कुटुंबप्रमुखाचे नाव काय आहे?
विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे?
घराची मालकी स्थिती काय आहे?
घरात किती खोल्या आहेत?
तुमचे स्वयंपाकाचे मुख्य इंधन कोणते आहे?
तुमच्याकडे लॅपटॉप किंवा संगणक आहे का?
तुमच्याकडे टेलिफोन, मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन आहे का?
तुमच्याकडे सायकल, स्कूटर किंवा मोटरसायकल आहे का?
तुमच्याकडे कार, जीप किंवा व्हॅन आहे का?
India Census 2027: देशाच्या जनगणनेचे बिगुल वाजले!
शौचालय आहे का?
पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणता आहे?
पिण्याचे पाणी आहे का?
विद्युतचा स्रोत कोणता आहे?
बाथरूम आहे का?
घरात गॅस कनेक्शन आहे का?
घरात टीव्ही आहे का?
इंटरनेटची सोय आहे का?
तुमचे मुख्य अन्नधान्य कोणते आहे?
तुमचा इमारत क्रमांक किंवा जनगणना क्रमांक काय आहे?
घराचा वापर
घराची स्थिती
घराच्या फरशीसाठी वापरलेले मुख्य साहित्य. म्हणजेच, फरशी सिमेंट, ग्रॅनाइट किंवा मार्बलची आहे का?
घराच्या भिंतींमध्ये कोणते साहित्य वापरले आहे?
घराच्या छतामध्ये कोणते साहित्य वापरले आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे कुटुंबप्रमुखाकडून गणनाकाराला दिली जातील. गणनाकार ही माहिती सुरक्षितपणे संग्रहित करेल. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाईल. प्रमुखांची माहितीदेखील ऑनलाइन गोळा केली जाईल.
नियमानुसार, दर १० वर्षांनी जनगणना होणे अपेक्षित असते, त्यानुसार २०२१ मध्ये जनगणना होणे नियोजित होते. मात्र, कोविड-१९ (COVID-19) महामारीच्या संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली.
२०११ मध्ये झालेली जनगणना: ही १५ वी राष्ट्रीय जनगणना होती. त्यावेळी झालेल्या जनगणनेत महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे ११.२४ कोटी इतकी नोंदवण्यात आली होती.
२०२१ ची प्रलंबित जनगणना: कोरोना महामारीनंतर विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही.
डिजिटल जनगणना: आगामी जनगणना ही भारताची पहिली *’डिजिटल जनगणना’* असेल, ज्यामध्ये मोबाईल ॲप आणि ऑनलाइन पोर्टलचा वापर केला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.