Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार? नितीन गडकरी यांनी सांगितली नवीन डेडलाईन

Mumbai-Goa Highway News : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मुंबई- गोवा महामार्गाबाबत केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. हा महामार्ग कधी पूर्ण होईल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 04, 2025 | 05:16 PM
मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार

मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार
  • पुणे-कोल्हापूर मार्गाचे काम कधी पूर्ण होईल?
  • धुळे-पिंपळगाव मार्गाचा प्रश्न कधी मार्गी?
Mumbai-Goa Highway News in Marathi: राज्यभरात अनेक महामार्गाचं काम सुरू असून त्यापैकीच एक म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग, सध्या मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 12 तासाहून अधिका वेळ लागतो. मात्र आता हा 12 तासांचा प्रवास केवळ सहा तासात पूर्ण करता येणार आहे. याच महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातील तीन महत्त्वाचे मार्ग…

प्रश्नोत्तर सत्रादरम्यान नितीन गडकरी यांना महाराष्ट्रातील खासदारांनी तीन महत्त्वाच्या मार्गांबाबत काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाने प्रश्न विचारले. यामध्ये काँग्रेसच्या धुळ्यातील खासदार शोभा बच्छाव यांनी धुळे-पिंपळगाव राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याच वेळी सुप्रिया सुळेंनी पुणे-कोल्हापूर मार्गाबद्दल चर्चा केली आणि अरविंद सावंत यांनी बहुचर्चित आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबद्दल चर्चा केली. या वेळी नितीन गडकरी यांनी तिन्ही मार्गांबाबत उत्तर दिले.

आता सर्वांना निकालाची लागली उत्सुकता; मात्र करावी लागणार 17 दिवसांची प्रतिक्षा

पहिला मुद्दा मुंबई-गोवा महामार्गाबाबत

गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? हा प्रश्न अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केला आणि नितीन गडकरी यांनी त्यावर काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित केली. “हा रस्ता २००९ मध्ये सुरू झाला. मागच्या सरकारच्या काळात रस्त्याचे काम सुरू झाले. अनेक कंत्राटदार बदलले गेले. फक्त जमीन अधिग्रहणाची समस्या होती. पण आतापर्यंत ८९.२९ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होईल. कोणताही विलंब होणार नाही”, असे नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले.

पुणे-कोल्हापूर मार्गाचे काम कधी पूर्ण होईल?

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच पुणे-कोल्हापूर मार्गाचे कामही प्रलंबित आहे. या संदर्भात नितीन गडकरी यांनी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. “पुणे ते सातारा मार्गाचे काम रिलायन्सकडे होते. ते रद्द करून या कामाचा पुन्हा आमचा विभाग आढावा घेत आहेत. पुण्यातील बायपास सेवेचे काम विभागाने सुरू केले आहे. खंबाटकी घाटातल्या नव्या दोन बोगद्यापैकी एक बोगदा लवकरच सुरू होईल. साताऱ्याच्या पुढे कोल्हापूरपर्यंतच्या कामात काही अडचणी आहेत. त्यावर माझी पुढच्या आठवड्यात बैठक आहे. वर्षभराच्या आत हे काम पूर्ण केलं जाईल”, असं ते म्हणाले.

धुळे-पिंपळगाव मार्गाचा प्रश्न कधी मार्गी?

काँग्रेसच्या धुळे खासदार शोभा बच्छाव यांनी धुळे-पिंपळगाव रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला आणि गडकरी यांनी उत्तर दिले. “हा प्रकल्प २०१० मध्ये बोओटीमध्ये पूर्ण झाला. २०१६ मध्ये पहिले नूतनीकरण एक वर्ष उशिराने झाले. कंत्राटदाराला १६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. २०२१ मध्ये दुसरे नूतनीकरण पुन्हा एक वर्ष उशिरा झाले. त्यावर ७ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. सध्या तिसरे नूतनीकरण सुरू आहे. ते जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. शेवटची अंतिम मुदत एप्रिल २०२६ आहे. जर धुळे ते पिंपळगाव चौपदरी रस्ता उपलब्ध नसेल, तर तो वाढवण्याचा प्रस्ताव आहे. तो मान्य झाला आहे, लवकरच समस्या दूर केली जाईल आणि काम सुरू होईल”, असे नितीन गडकरी म्हणाले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची सध्याची स्थिती

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग-६६ महामार्गाचे रुंदीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. ३५५.२८ किमी महामार्गापैकी ३३४.३४ किमी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. जे ९३.१८% काम पूर्ण झाले आहे हा प्रकल्प गेल्या दशकाहून अधिक काळापासून सुरू आहे. भूसंपादन आणि इतर समस्यांमुळे विलंब होत आहे, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात खड्डेमय रस्ते परिस्थिती आणखी बिकट करतात. सध्या, मुंबई ते गोवा प्रवास करण्यासाठी १२ ते १३ तास ​​लागतात. तथापि, नवीन महामार्गामुळे प्रवास ८ ते १० तासांचा होणार आहे.

Digital 7/12 ला कायदेशीर मान्यता; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

Web Title: Central roadways minister nitin gadkari mumbai goa highway loksabha winter session news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai-Goa highway
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

कोथरूडमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उपायुक्तांना निवेदन
1

कोथरूडमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उपायुक्तांना निवेदन

2030 पर्यंत भारताच्या EV Market मध्ये 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता, नितीन गडकरींचा विश्वास
2

2030 पर्यंत भारताच्या EV Market मध्ये 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता, नितीन गडकरींचा विश्वास

Sanjay Nirupam : “शिवसेना भक्कम तरच महाराष्ट्रात हिंदू मजबूत…”, संजय निरुपम यांचा निर्वाळा
3

Sanjay Nirupam : “शिवसेना भक्कम तरच महाराष्ट्रात हिंदू मजबूत…”, संजय निरुपम यांचा निर्वाळा

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर ‘ सारख्या ॲप आधारित कंपन्यावर गुन्हे दाखल, प्रताप सरनाईक यांचा निर्णय
4

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर ‘ सारख्या ॲप आधारित कंपन्यावर गुन्हे दाखल, प्रताप सरनाईक यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.